Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अ‍ॅडव्हान्टेज गोदावरी इंजिनिअरिंग चॅप्टरचा अनावरण सोहळा उत्साहात

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
27/11/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
अ‍ॅडव्हान्टेज गोदावरी इंजिनिअरिंग चॅप्टरचा अनावरण सोहळा उत्साहात

जळगाव(प्रतिनिधी)- अडच इंटरनॅशनल इंडिया चॅप्टरअंतर्गत असलेल्या मटेरियल अ‍ॅडव्हान्टेज गोदावरी इंजिनिअरींग चॅप्टर चा अनावरण समारंभ २२ नोव्हेंबर रोजी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्साहात पार पडला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्हीएनआयटी, नागपूर विद्यापीठाचे डॉ.बी.आर.संकपाल, गोदावरी फाऊंंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील्, अडच इंटरनॅशनल इंडीयाचे चेअरमन सुधाकर बोंडे, अ‍ॅडमिन डॉ.विवेक सिंगल यांच्यासह सी मेट पुण्याचे डॉ.सुनीत राणे, डीएनसीव्हीपीचे प्राचार्य डॉ.डॉ.आर.बी.वाघुळदे, गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.विजय पाटील हेउपस्थीत होते. मान्यवराच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विजय पाटील यांनी एएसएम् इंटरनॅशनल इंडिया चॅप्टर ची पार्श्वभुमी सांगतांना स्थापन होत असलेल्या मटेरीयल अ‍ॅडव्हान्टेज चॅप्टरची संपुर्ण माहिती दिली. डॉ. सुधाकर बोंडे यांनी राबविण्यात येणार्‍या सर्व कार्यक्रमांची माहिती देतांना इंटरनॅशनल स्तरावरील असणारे फायदे आणि संधी याबद्दल माहिती दिली. डॉ.विवेक सिंगल यांनी इतर संलग्नीत असलेल्या चॅप्टर संदर्भात माहिती दिली.

यावेळी डॉ.वर्षा पाटील यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी नागपूर विद्यापीठाचे डॉ.बी.आर.संकपाल यांनी मटेरियल म्युच्युलीझम एनर्जी कन्व्हर्जन अँड स्टोरेज अ‍ॅप्लीकेशन या विषयावर सादरीकरण केले. त्यामध्ये त्यांनी सिंथेसिस ऑफ नॅनोमटेरियल क्वॉटम डॉट, नॅनो वायर्स तसेच नॅनोटयुब्स ऑफ इन ऑग्यानिक सेमी कंडक्ट्रीग मटेरियल आणि सोलर सेल सेन्सर्स आणि सुपर कंपसिटर्स यांच्या ऑप्लिकेशन संदर्भात माहिती दिली. दुस-या सत्रात सिम्पोझिअम मध्य गेस्ट ऑफ ऑनर डॉ.सुनित राणे यांनी अ‍ॅडीटिव्ह मॅन्युफॅक्चरींगबद्दल माहिती देतांना थ्रीडी प्रिंटीग चे अ‍ॅप्लीकेशन समजुन सांगितले.

याशिवाय उ-चएढ च्या सोयीसुविधांची माहिती दिली. तसेच डॉ. आर.बी.वाघुळद यांनी यांनी ग्रीन एनर्जी व रिनीवेबल एनर्जी, नॅनोटेक्नोलॉजी इन सोलर पी.व्ही.सेल नॅनोटेक्नॉलाजी इन विंड टर्बाईन तसेच बायोमास कन्व्हर्जनबद्दल माहिती दिली. पोस्टर स्पर्धेत वर्षा, सिमा, मोहिनीचे यश कार्यक्रमाच्या तिसर्‍या सत्रात मटेरियल अ‍ॅडव्हान्टेज मटेरियल सायन्स व नॅनॉटेक्नॉलॉजी या विषयावर पोस्टर स्पर्धा घेण्यात आली त्यात जिल्ह्यातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे परिक्षण डीएनसीयूपचीे डॉ.रविंद्र लढे, गोदावरी अभियांत्रिकीचे डॉ.सरोज भोळे, यांनी केले.

स्पर्धेत प्रथम क्रमांक वर्षा पाटील (तृतीय यंत्र विभाग, गोदावरी अभियांत्रिकी,जळगांव), डीएनसीव्हीची सिमा पाटील, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रियंका काळे हिने तृतीय क्रमांक पटाकविला. विजेत्या प्रथम स्पर्धकाला ३ हजार तर द्वितीय, तृतीय क्रमांकाला २ हजार रुपये रोख रकमेसह प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोशनी पाटील हिने केले. यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.विजय पाटील यांच्या मार्गदशनाखाली प्रा.तुषार कोळी (यंत्र विभागप्रमुख), प्रा.योगेश वंजारी (फॅल्कटी अ‍ॅडव्हायजर) यांच्यासह प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Previous Post

‘अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३’ चे आयोजन

Next Post

८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक नोंदणी

Next Post
प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे; जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक नोंदणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo