Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उच्च न्यायालयाचा सवाल;सेक्स वर्करला नाही म्हणण्याचा अधिकार मग पत्नीला का नाही?

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/01/2022
in राज्य, राष्ट्रीय, विशेष, सामाजिक
Reading Time: 1 min read
उच्च न्यायालयाचा सवाल;सेक्स वर्करला नाही म्हणण्याचा अधिकार मग पत्नीला का नाही?

वैवाहिक बलात्काराबाबतच्या याचिकांवर सुनावणी करतांना दिल्ली उच्च न्यायालयाने अतिशय गंभीर टिप्पणी केली आहे. यावर न्यायालयाने म्हटले कि जेव्हा सेक्स वर्करला सेक्स नाकारण्याचा अधिकार आहे, तर मग पत्नी का नकार देऊ शकत नाही?

जेव्हा सेक्स वर्करला सेक्स नाकारण्याचा अधिकार आहे, तर मग पत्नी का नकार देऊ शकत नाही? असा गंभीर सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. न्यायमूर्ती राजीव शकधर आणि न्यायमूर्ती सी हरी शंकर यांच्या खंडपीठासमोर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३७५ अंतर्गत केलेला अपवद हटविण्याच्या याचिकेवर सुनावणी सुरु होती.

न्यायमूर्ती शकधर म्हणाले की, अत्याचार काद्यात सेक्स वर्करशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्याच्या बाबतीत कोणताही सूट नाही. ते पुढे म्हणाले की आमच्या न्यायलयांनी असे म्हटले आहे की, सेक्स वर्कर कोणत्याही टप्प्यावर नाही म्हणून शकतात मग पत्नीला यापेक्षा खालच्या पातळीवर ठेवता येईल का? असा सवाल उपस्थित केला.

यावर न्यायमूर्ती राज शेखर राव म्हणाले की, विवाहित महिलेला असहमतीने सेक्स करण्यापासून कमी संरक्षण देण्याचे कारण नाही. तसेच आपल्याला विविध स्तरातून सुचना मिळत असल्याचेही खंडपीठाला सांगितले. यावर न्या.शंकर यांनी वैवाहित नातेसंबंधीतील सेक्स हा सेक्स वर्करसारखा नसतो. असं मत व्यक्त केलं.

न्यायाधीशांनी बहुतेक युक्तिवाद कायद्याऐवजी संतापावर होतात असं म्हणत राव यांनी कायदेशीर पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, हे न्यायालय असून याठिकाणी बायकांचा राग आणि हाल दाखवून ते कमी करायचे नाही तर कायदेशीर बाजूही दाखवायला हवी.

यावर केंद्र सरकारने गुरुवारी उच्च न्यायलयात म्हटले की, वैवाहित लैंगिक अत्याचाराचे गुन्हेगारीकरण करण्याच्या मुद्द्यावर विधायक दृष्टीकोनाचा विचार केला जातोय. दरम्यान केंद्राने यावर संपूर्ण फौजदारी कायद्यातील सर्वसमावेशक सुधारणांबाबत राज्य सरकार, भारताचे सरन्यायाधीश ,संसद सदस्य आणि इतरांकडून सूचना मागवल्या आहेत.

यावर न्यायमूर्ती राजीव शकधर यांनी सांगितले की, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आदल्या दिवशी त्यांना या प्रकरणाचा उल्लेख केला. केंद्र सरकारच्या वकील मोनिका अरोरा यांनी खंडपीठाला सांगितले की, केंद्र सरकार फौजदारी कायद्यात सुधारणा करण्याचे व्यापक काम करत आहे, ज्यामध्ये आयपीसीच्या कलम 375 चा समावेश आहे. दरम्यान न्यायालय शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी सुरु ठेवणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वत:ची काळजी घ्या, कोरोना विषाणूला घाबरु नका!

Next Post

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या दिनदर्शिकेचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते प्रकाशन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo