Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीला राज्य स्पर्धेत 11 रौप्य पदके

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

 जळगाव दि.16 – केसीई सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीमध्ये सराव करणाऱ्या 13 खेळाडूंची डेरवण, जिल्हा रत्नागिरी येथे झालेल्या 22 व्या एरोबिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघात निवड झाली होती. सदर स्पर्धा या महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या मान्यतेने झाल्या.

या स्पर्धेत विविध वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करत एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीच्या खेळाडूंनी तब्बल 11 रौप्यपदकांची लयलुट केली. सदर स्पर्धेत अनुष्का चौधरी, साची इंगळे व कृष्णाई रेंभोटकर या अनुभवी खेळाडूंनी आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी केली तर नवोदित खेळाडूंपैकी गायत्री देशपांडे, सिया राका, आयुष वंजारी व माही फिरके यांनी पदार्पणातच उत्कृष्ट कामगिरी केली. एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमी व जळगाव जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेद्वारे एरोबिक जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारात आजवर अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर सहभाग घेतला आहे. या सर्व खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करता माही फिरके या नवोदित खेळाडूने आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत तब्बल 15.30 गुणांची कमाई केली. या सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रा. निलेश जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच सोबत प्रा. निलेश जोशी यांनी स्पर्धेतील पंच मंडळाची देखील जबाबदारी सांभाळली. या यशाबद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे, प्राचार्य डॉ. अशोक राणे, जिमखाना समिती प्रमुख डॉ. सी. पी. लभाणे, क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, जळगाव जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटना सचिव प्रवीण पाटील, अक्षय सोनवणे तसेच सर्व पालकांनी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

पदक विजेते खेळाडू:

नॅशनल डेव्हलपमेंट गट-

आयुष वंजारी (पुरुष एकेरी) – रौप्य पदक

आयुष वंजारी व माही फिरके (मिश्र दुहेरी) – रौप्य पदक

सब ज्युनिअर गट-

अनुष्का चौधरी, साची इंगळे व गायत्री देशपांडे (मिश्र तिहेरी) – रौप्य पदक 

अनुष्का चौधरी, साची इंगळे, गायत्री देशपांडे, कृष्णाई रेंभोटकर व सिया राका (समूह) – रौप्य पदक

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय,जळगाव येथे शिक्षकेतर कर्मचारी दिन उत्साहात साजरा

Next Post

“खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च मध्ये योगा स्पर्धा संपन्न

Next Post

"खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च मध्ये योगा स्पर्धा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo