Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ओमिक्रोन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर आणखी कडक निर्बंध

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
ओमिक्रोन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर आणखी कडक निर्बंध

मुंबई(प्रतिनिधी)- दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोविडच्या नव्या विषाणू ओमिक्रोनचा संकट घोंगावत असताना आंतरराष्ट्रीय विमानतळावर निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहे.

या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अनेक देशांना ‘कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेले देश’ (at-risk) म्हणून घोषित केले आहे. सदर विषाणूचा प्रसार महाराष्ट्रामध्ये रोखण्यासाठी राज्यात हवाई वाहतूकीच्या यासंदर्भात तातडीने अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.

28 नोव्हेंबर 20 21 रोजी भारत सरकारने लावलेले निर्बंध आणि त्याच्याशी संबंधित जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे किमान निर्बंध म्हणून तत्कालिक प्रभावाने अमलात येतील.

इमिग्रेशनचे डीसीपी तसेच एफ आर आर ओ यांना असे निर्देशित करण्यात आले आहे की, त्यांनी विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानाद्वारे येणाऱ्या सर्व प्रवाशांना त्यांनी मागील पंधरा दिवसात ज्या ज्या देशांना भेट दिलेली आहे, त्यांची सविस्तर माहिती देणे बंधनकारक करावे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एम आय ए एल) ला ही असे निर्देशित करण्यात आले आहे की, त्यांनी मागील पंधरा दिवसात हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती सर्व एअरलाइन्सना ही द्यावी जेणेकरून या प्रवाशांच्या यात्रेसंबंधी माहितीची पडताळणी करणे सोपे होईल. प्रवाशांनी जर चुकीची माहिती दिली तर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या विविध कलमांखाली त्यांच्याविरोधात कारवाई केली जाऊ शकते.

भारत सरकारने घोषित केलेल्या ‘कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेले देश’ या राष्ट्रातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना प्राधान्य क्रमाने वेगळा काउंटर बनवून एम आय ए एल आणि विमानतळ प्राधिकरण यांनी त्यांची पडताळणी करावी. अशा सर्व प्रवाशांना सात दिवसांकरिता संस्थात्मक विलगीकरण करणे आवश्यक असेल. त्याच प्रमाणे दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी त्यांचे आर टी पी सी आर चाचण्याही केल्या जातील. कोणत्याही चाचणीत ते पॉझिटिव आढळल्यास त्यांना इस्पितळात दाखल करण्यात येईल आणि जर चाचण्या निगेटीव्ह आल्या तर अशा प्रवाशांना सात दिवस गृह विलगीकरणात राहावे लागेल.

धोकादायक नसलेल्या इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आर टी पी सी आर चाचणी विमानतळावर उतरल्यावर करणे बंधनकारक असेल आणि चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्यासही त्यांना 14 दिवस गृह विलगीकरणात राहावे लागेल. जर या प्रवाशांपैकी कोणी पॉझिटिव्ह असेल तर त्यांना इस्पितळात भरती केले जाईल.

Team Satymev Jayate

Previous Post

3 डिसेंबर रोजी पेन्शन संघर्ष मेळाव्याचे आयोजन

Next Post

कारखान्यांमध्ये सुरक्षा ही वैधानिक गरज -प्रधान सचिव

Next Post
कारखान्यांमध्ये सुरक्षा ही वैधानिक गरज -प्रधान सचिव

कारखान्यांमध्ये सुरक्षा ही वैधानिक गरज -प्रधान सचिव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo