Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कारखान्यांमध्ये सुरक्षा ही वैधानिक गरज -प्रधान सचिव

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
कारखान्यांमध्ये सुरक्षा ही वैधानिक गरज -प्रधान सचिव

मुंबई(प्रतिनिधी)- सामाजिक सुरक्षेबरोबर औद्योगिक सुरक्षा महत्वाची असून यासाठी कामगार विभाग सातत्याने नवनवीन नियम तयार करत आहे. येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय संघटना असो की त्याबाबतचे प्रमाणीकरण असो, प्रत्येक रासायनिक किंवा औद्योगिक कारखान्यामध्ये सुरक्षा ही वैधानिक गरज बनली आहे. आज बाजारात रोज नवीन आय.पी.ओ. येत आहे. मात्र त्यासाठी त्यांना आपला मानक सुरक्षा लेखापरीक्षण अहवाल सादर करावा लागतो. त्यामुळे प्रत्येकाने वैयक्तिक सुरक्षेची काळजी घेतली तर त्यांना संघटनात्मक ध्येय सहज मिळू शकते. एकटा व्यक्ती प्रगती करू शकत नसून त्यांची संघटनेसोबतच प्रगती सहज होऊ शकत असल्याचे प्रतिपादन कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद-सिंगल यांनी आज व्यक्त केली.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय आणि नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील रासायनिक कारखान्यातील ऑपरेटर्स, पर्यवेक्षक यांच्याकरिता ‘ॲक्टसेफ-केमसेफ्टी’ या सुरक्षाविषयक शिबिराचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कामगार आयुक्त सुरेश जाधव, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालक सुधाकर राठोड तसेच महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेचे संचालक शशांक साठे आदी उपस्थित होते.

श्रीमती सिंगल म्हणाल्या, भविष्यात येणारा काळ आणि त्यानुसार राज्यातील औद्योगिक आणि रासायनिक कारखान्यात काम करणाऱ्या प्रत्येकाने वैयक्तिक सुरक्षेबरोबर कारखान्याची सुरक्षा करणे काळाची गरज बनली आहे. एखादा कारखाना किंवा कंपनी ही आपल्याकडे सुरक्षततेबाबतची किती माहिती आहे, यावरून निवड करत असते. यावरून कारखाना कर्मचाऱ्यांनी उत्तम कामगिरी, अचूकता आणि परिणामाभिमुख काम करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत श्रीमती सिंगल यांनी व्यक्त केले.

कामगार आयुक्त श्री.जाधव म्हणाले की, राज्यातील कामगारांचे हित जपण्यासाठी जवळपास 29 कायदे करण्यात आले असून रासायनिक तसेच औद्योगिक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शासन काळजी घेत असते. पूर्वीचा काम करणारा कामगार हा एका कंपनीमध्ये आयुष्यभर काम करत असे. पण आता जग स्पर्धात्मक झाले असल्याने आपल्याकडे सुरक्षेविषयक असलेल्या ज्ञानावर कारखान्यात निवड केली जात आहे. औद्योगिक तसेच रासायनिक कारखान्यात सुरक्षाविषयक प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांची निवड करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे या सुरक्षा प्रशिक्षणाचा उपयोग सर्वांना होणार असल्याची गरजही श्री.जाधव यांनी व्यक्त केली.संचालक

श्री.राठोड म्हणाले की, कारखान्यात होणारे 80 टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे होत असतात. औद्योगिक आणि रासायनिक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना सुरक्षाविषयक प्रशिक्षणाचा नेहमीच फायदा होत आहे. गेल्या तीन वर्षापासून शासनस्तरावर हे प्रशिक्षण शिबिर राबविण्यात येत असून यामुळे अपघात टाळण्यासाठी ‘ॲक्टसेफ-केमसेफ्टी’ या प्रशिक्षणाचा निश्चितच फायदा होणार असल्याचे श्री.राठोड यांनी यावेळी सांगितले.

Team Satymev Jayate

Previous Post

ओमिक्रोन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर आणखी कडक निर्बंध

Next Post

निराधार अवस्थेत सापडलेल्या बालकाच्या पालकांना आवाहन

Next Post
निराधार अवस्थेत सापडलेल्या बालकाच्या पालकांना आवाहन

निराधार अवस्थेत सापडलेल्या बालकाच्या पालकांना आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo