Thursday, July 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केंद्रीय पथकाकडून पुण्याच्या ताडीवाला रोड येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
केंद्रीय पथकाकडून पुण्याच्या ताडीवाला रोड येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

पुणे, दि. 11- पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण आढळलेल्या ताडीवाला रोड येथील प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना  व आरोग्य सुविधांबाबत केंद्रीय पथकाने पाहणी केली.

Maha Info Corona Website

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या  पार्श्वभूमीवर केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक पुण्यात दाखल झाले असून या पथकाच्या सदस्यांनी आज ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या महात्मा जोतिबा फुले प्राथमिक विद्यालयात क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या विविध कक्षांना भेट देऊन  येथील आरोग्य व इतर सुविधांच्या आढावा घेऊन ताडीवाला रोड परिसरातील लुंबिनी नगर, सिध्दार्थनगर येथील वस्त्यांची पहाणी केली. यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, साखर आयुक्त सौरभ राव तसेच केंद्रीय पथक प्रमुख केंद्रीय  सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त उप महासंचालक  डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. मानस प्रतिम रॉय तसेच समन्वय डॉ. अरविंद अलोने, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर उपस्थित होते.

केंद्रीय पथकाने ढोले पाटील रोड येथील महात्मा जोतिबा फुले विद्यालयातील क्वारंटाईन करण्यात आलेल्या या शाळेतील वैद्यकीय तपासण्यांबाबत आढावा घेतला. येथील नागरिकांना देण्यात येत असलेल्या चहा, नाश्ता, भोजना आदी सुविधांची माहिती घेतली.

ताडीवाला रोड  परिसरातील लुंबिनी नगर, सिध्दार्थनगर येथील प्रतिबंधित क्षेत्राची देखील केंद्रीय पथकाने पहाणी केली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि साखर आयुक्त सौरभ राव यांनी या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी, नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण याबाबत माहिती दिली. केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांना मिळत असलेल्या आरोग्य सुविधांबाबत माहिती घेतली. जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने समन्वय राखत कोरोनाच्या या साथीला प्रतिबंध करण्यासाठी केलेल्या उपाययोजना,  आरोग्य सुविधा याबाबत केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केले.

यावेळी पोलिस उपायुक्त महेंद्र रसाळ, नगरसेवक कुणाल राजगुरु, मेहबूब नदाफ, जावेद शेख, तसेच पुणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राम यांनी कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, वैद्यकीय सुविधा याबाबत केंद्रीय पथकाला विस्तृत माहिती दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी,पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे निर्देश

Next Post

जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या जिल्हावासियांच्या विलगीकरणासाठी नियोजन सुरु

Next Post
जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या जिल्हावासियांच्या विलगीकरणासाठी नियोजन सुरु

जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या जिल्हावासियांच्या विलगीकरणासाठी नियोजन सुरु

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo