Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यात डॉक्टरांचे योगदान अद्भुत  -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
14/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कोरोना मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यात डॉक्टरांचे योगदान अद्भुत  -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई(प्रतिनिधी)- जगात कोरोनाचे थैमान सुरु असताना भारतात कदाचित सर्वाधिक मृत्यूदर राहील अशी परिस्थिती होती. परंतु पीपीई किट परिधान करून डॉक्टर्स, निवासी डॉक्टर तसेच नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मी यांसह सर्व कोरोना योद्ध्यांनी समर्पण भावनेने अद्भुत काम केल्यामुळेच देशातील मृत्युदर नियंत्रणात राहिला असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राज्यपाल कोश्यारींच्या पुढाकाराने राजभवन येथे आयोजित ‘कृतज्ञता’ सोहळ्यात विविध क्षेत्रातील नामवंत डॉक्टरांचा बुधवारी (दि. १३) राज्यपालांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

कोरोना काळात सर्वत्र परीक्षा नको असा सूर असताना आपण परीक्षा घेण्याबाबत आग्रही राहिलो आणि वैद्यकीय परीक्षांसह सर्व परीक्षा घेतल्या गेल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले नाही व अधिक डॉक्टर्स उपलब्ध झाले असे राज्यपालांनी सांगितले.आजही जगातील कोरोना केसेसची आकडेवारी चिंताजनक असल्याचे सांगून नागरिकांनी कोविड प्रतिबंधक आचरण पाळण्याबाबत डॉक्टरांनी जनजागृती करावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.जागतिक आकडेवारीनुसार आजही जगात १.७० कोटी एक्टिव्ह कोरोना केसेस असून दररोज ४ लाख केसेस निघत आहेत. त्यामुळे कोरोना विरोधातील पवित्रा कायम ठेवावा लागेल असा इशारा नेत्रशल्यचिकित्सक डॉ. केकी मेहता यांनी यावेळी दिला.

राज्यपालांच्या हस्ते डॉ केकी मेहता, डॉ मिलिंद कीर्तने, डॉ शशांक जोशी व डॉ अमित मायदेव, केईएम हॉस्पिटलचे त्वचारोग तज्ञ् डॉ उदय खोपकर, फोर्टिस हॉस्पिटलचे संचालक डॉ राहुल पंडित, बीकेसी जम्बो कोविड सेन्टरचे डॉ राजेश ढेरे, वाडीया हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मिनी बोधनवाला, बॉम्बे हॉस्पिटल चे कान नाक घसा तज्ञ डॉ राजीव नेरुरकर, लीलावती हॉस्पिटलचे डॉ तुषार रेगे, बॉम्बे हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ञ डॉ सुजित कोरडे, रिलायंस हॉस्पिटलच्या डॉ रेखा डावर, बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ विक्रम करमरकर, मित्तल हॉस्पिटलचे डॉ विनायक तायडे यांचा सत्कार करण्यात आला.युवा हृदयरोग तज्ञ डॉ समीर पागाद यांनी प्रास्ताविक केले तर राज्यपालांच्या उपसचिव प्राची जांभेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Team Satymev Jayate

Previous Post

नवतरूणांनी मतदार नोंदणीसाठी सहभाग घ्यावा -मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

Next Post

डिझेलवर धावणाऱ्या १ हजार गाड्यांचे सीएनजीमध्ये करणार रुपांतर -परिवहन मंत्री ॲड.अनिल परब

Next Post
डिझेलवर धावणाऱ्या १ हजार गाड्यांचे सीएनजीमध्ये करणार रुपांतर -परिवहन मंत्री ॲड.अनिल परब

डिझेलवर धावणाऱ्या १ हजार गाड्यांचे सीएनजीमध्ये करणार रुपांतर -परिवहन मंत्री ॲड.अनिल परब

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo