Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नवतरूणांनी मतदार नोंदणीसाठी सहभाग घ्यावा -मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
14/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
नवतरूणांनी मतदार नोंदणीसाठी सहभाग घ्यावा -मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मुंबई(प्रतिनिधी)- महानगरपालिका आणि स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात होण्यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्यात यावा. नवमतदारांनी नोंदणीसाठी स्वत:हून सहभाग घ्यावा. यासाठी विशिष्ट टॅगलाईनचा उपयोग करणाच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज झालेल्या बैठकीत महानगरपालिकेला केल्या.

या बैठकीस बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव अतुल जाधव, सहाय्यक आयुक्त (जनसंपर्क) जगदिश मोरे, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील स्वीप सल्लागार दिलीप शिंदे आदी उपस्थित होते.

नवीन मतदार नोंदणीसाठी स्वीपअंतर्गत नवनवीन संकल्पना राबवून नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष भर देण्यात येत आहे. यासाठी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. यात उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या नवतरूणांसाठी बॅनर्स, पोस्टर्स तसेच व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर देण्यात यावेत. हाऊसिंग फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांचाही मतदार नोंदणीसाठी सहभाग घ्यावा, अशा सूचनाही श्री.देशपांडे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

नवमतदारांना आवाहन करण्यासाठी समाजमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या संस्थांनाही अंतर्भूत करण्यात यावे. यासाठी क्रियेटिव्ह तयार करून त्यांचा समाजमाध्यमाद्वारे जास्तीत जास्त प्रसार करण्यात यावा. 18 वर्षे पूर्ण झालेल्या तरूणांना मोबाईलवरून नोंदणी करता यावी यासाठी सुविधा केंद्रे उपलब्ध करून द्यावीत. कोविड काळात ऑनलाईन शिक्षण सुरू आहे त्यातूनही नोंदणी न केलेल्यांना मतदार नोंदणी करण्याबाबत संदेश द्यावा, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी केल्या.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

तुळजाई फाउंडेशनच्या वतीने श्रीराम विद्यालयाला ११ संगणक भेट

Next Post

कोरोना मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यात डॉक्टरांचे योगदान अद्भुत  -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Next Post
कोरोना मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यात डॉक्टरांचे योगदान अद्भुत  -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कोरोना मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यात डॉक्टरांचे योगदान अद्भुत  -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d