Sunday, July 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जळगाव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/04/2026
in जळगाव, सामाजिक
Reading Time: 1 min read
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जळगाव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

जळगाव -(प्रतिनिधी)- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त (११ एप्रिल १८२७) आणि बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला, सारा फाउंडेशन व भीमकन्या ग्रुप वाघ नगर, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात स्थानिक नागरिकांना आरोग्य तपासणी व होमिओपॅथी औषधे मोफत उपलब्ध करून देण्यात आली.
शिबिरात चामुंडा माता रुग्णालय, जळगाव येथील अनुभवी डॉक्टरांच्या टीमने सेवा प्रदान केली. डॉ. जयेश वाल्हे, डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ. अमिता श्रीवास्तव, डॉ. स्वाती सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णांची तपासणी केली आणि आवश्यक होमिओपॅथी औषधे मोफत वाटप केली. शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दाखवून लाभ घेतला.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित आमदार राजू मामा भोळे, उपमहापौर मनोज भाऊ चौधरी, नगरसेवक अनिलभाऊ अडकमोल, चिटणीस भूषण लाडवंजारी, पदवीधर प्रकोष्ठ अध्यक्ष शिरीष तायडे, होते.

सारा फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष डॉ. चंद्रकांत भालेराव, उपाध्यक्ष सौ. सुरेखा चंद्रकांत भालेराव, डॉ. सागर चंद्रकांत भालेराव, इतर मान्यवर:, साहित्यिक जयसिंग वाघ, दिलीप तासखेडकर, प्रितम शिरतुरे, डी. एच. भास्कर, विनोद सपकाळे, बापू साळुंके, प्राध्यापक अशोक हनवते, अरविंद बिऱ्हाडे, वसंत जावळे, चंद्रशेखर ओतारी, मिलिंद वाल्हे, अरविंद बाविस्कर, राहुल भालेराव, भीमकन्या ग्रुपच्या वतीने:
साधनाताई बाविस्कर, विशाखा हनवते, ज्योती सूरदास, संगीता सपकाळे, स्वाती मेढे, ज्योती लोखंडे, दिपाली सपकाळे, शितल अहिरे, अलका तायडे, माधुरी वाघ, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वांद्रे सर यांनी केले. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम अतिशय यशस्वीरीत्या पार पडला.

फुले-आंबेडकर विचारांचा प्रसार करणाऱ्या या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये आरोग्य सेवा ही सामाजिक न्यायाची एक महत्त्वाची बाजू आहे. सारा फाउंडेशन व भीमकन्या ग्रुपने केलेले हे कार्य समाजातील गरजू वर्गासाठी प्रेरणादायी ठरले. उपस्थित मान्यवरांनी अशा सामाजिक उपक्रमांना पाठबळ देण्याचे आवाहन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न;सहकाऱ्यांच्या सामूहिक जपातून विश्वशांतीची प्रार्थना

Next Post

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

Next Post
बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo