Monday, May 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न;सहकाऱ्यांच्या सामूहिक जपातून विश्वशांतीची प्रार्थना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/04/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न;सहकाऱ्यांच्या सामूहिक जपातून विश्वशांतीची प्रार्थना

जळगाव-(प्रतिनिधी)-जैन प्लास्टिक पार्क, जैन हायटेक प्लांट फॅक्टरी , जैन अॅग्री पार्क तसेच जैन फूड पार्क येथील जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी ‘विश्वनवकार महामंत्र दिन’ सामुहिकपणे मंत्र जपत उत्साहात संपन्न केला. सकाळी नियोजित वेळेत जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या विविध प्रकल्प परिसरात सामूहिक नवकार महामंत्र जप करण्यात आला. यामध्ये अधिकाऱ्यांसह सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून भक्तिमय वातावरण निर्माण केले.
जैन प्लास्टिक पार्क, जैन हायटेक प्लांट, जैन एग्री पार्क तसेच जैन फूड पार्क येथे शिस्तबद्ध पद्धतीने सामूहिक जप करण्यात आला. यावेळी शांत, एकाग्र आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले. सहभागी सर्वांनी सामूहिक प्रार्थना करीत अहिंसा आणि विश्वशांतीचा संकल्प घेतला. या नमस्कार महामंत्राद्वारे कोणत्याही व्यक्तीची पूजा न होता गुणसमुच्चयाची पूजा साधली जाते. ह्या योगे आपल्या विकारांवर विजय मिळवीत निर्विकार होण्याचा मार्ग प्रशस्त होतो. ही प्रार्थना केवळ जैन धर्मियांची नसून सर्व मानव जातीला मिळालेली शाश्वत देणगीच आहे.

सामूहिक जपामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचा अनुभव सहभागींकडून व्यक्त करण्यात आला. गेल्या वर्षापासून जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो)तर्फे संपूर्ण देशासह जगात ठिकठिकाणी विश्व नवकार महामंत्र प्रार्थनेचे आयोजन केले जाते. जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गतवर्षी झालेल्या ‘विश्व नवकार महामंत्र सामूहिक जप’ उपक्रमात तब्बल ८१ हजार जणांनी विक्रमी सहभाग नोंदविला होता. यावर्षी सुद्धा अधिक संख्येने सहभाग नोंदविला गेला.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड्स लि. यांसारख्या उद्योग संस्थांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. सर्वधर्मीय बांधवांना सहभागी करून वर्तमान परिस्थितीत विश्वशांतीचा संदेश देण्याचा आयोजकांचा मुख्य उद्देश होय. ‘नवकार महामंत्र दिना’च्या निमित्ताने जळगावात भक्ती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. आगामी ‘विश्व नवकार महामंत्र सामूहिक जप’ उपक्रमासाठीही या कार्यक्रमातून सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कंपनीतील विविध विभागांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन

Next Post

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जळगाव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

Next Post
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जळगाव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जळगाव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड;पुण्याला होणार राज्यस्तरीय स्पर्धा; निवड खेळांडूंना चषक देऊन गौरव

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड;पुण्याला होणार राज्यस्तरीय स्पर्धा; निवड खेळांडूंना चषक देऊन गौरव

लोहारा विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल 89.01 % यशाची परंपरा कायम!!!

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा!;प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d