Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशन व कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित

न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेचे रविवारी आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/12/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. १ (प्रतिनिधी) – गांधी रिसर्च फाऊंडेशन व कयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. व्याख्यानमालेचे हे तिसरे वर्ष असून तृतीय पुष्प गुंफण्यासाठी साम्ययोग साधनाचे संपादक मा. श्री. रमेश दाणे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. “दादा धर्माधिकारींचे विचार आणि युवक” या विषयावर ते संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्मधिकारी भूषविणार आहेत.

ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रथम अध्यक्ष न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी हे महिलांच्या हक्कांचे समर्थन करणारे, समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देणारे, गांधी विचारांवर आधारित समाज घडवण्याची जाण असलेले तत्त्वनिष्ठ कार्यकर्ते होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य त्यासाठीच समर्पित केले होते. न्या. धर्माधिकारी यांनी सर्वोदय वारसा आत्मसात केला आणि आदर्श जीवनाचा मार्ग स्वीकारला होता. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरही त्यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षाची भूमिका सक्रियपणे स्वीकारली आणि फाऊंडेशनच्या उपक्रमांना सर्वोदय साकार करण्याच्या दिशेने मार्गदर्शन केले. गांधींच्या विचारांवरील आधारित न्या. धर्माधिकारी यांचा चिरंतन वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ गांधी रिसर्च फाऊंडेशन व्याख्यानमाला आयोजित करत असते.

या स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ. अभय बंग यांनी “दारूमुक्तीसाठी अहिंसक व विधायक चळवळ : गडचिरोली प्रयोग” या विषयावर गुंफले तर दुसरे पुष्प मेंढा लेखा गावाचे नायक श्री. देवाजी तोफा यांनी “सहमतीने गावाच्या स्वराज्याकडे” या विषयावर गुंफले.

२०२३ हे वर्ष महात्मा गांधींचे सहाध्यायी दादा धर्माधिकारी यांचे १२५ वे जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यासाठीच व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प दादा धर्माधिकारी यांना अर्पण केले जाणार आहे. गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात सकाळी १०.३० ते १२ या वेळात होणाऱ्या या व्याख्यानास ज्येष्ठ गांधीवादी डॉ.सुगन बरंठ, फाऊंडेशनचे अनिल जैन, विदयापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.एस. टी.इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक श्री.अजय शिंदे, डॉ.सचिन नांद्रे उपस्थित राहणार आहेत. सादर व्याख्यानास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कृपया गांधी रिसर्च फाउंडेशनशी ०९४०४९५५२७२, ०९४०४९५५२२० या क्रमांकावर संपर्क साधावा.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

क. ब. चौ. उमवीच्या अध्ययन व संशोधन केंद्राच्या प्रमुखपदी डॉ. नितीन बडगुजर यांची निवड

Next Post

प्रा. डॉ. नितीन बडगुजर यांना आविष्कार स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जाहीर

Next Post
क. ब. चौ. उमवीच्या अध्ययन व संशोधन केंद्राच्या प्रमुखपदी डॉ. नितीन बडगुजर यांची निवड

प्रा. डॉ. नितीन बडगुजर यांना आविष्कार स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo