Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गालापुर जि.प. प्राथमिक शाळेत फिट इंडिया मोहीम अंतर्गत क्रिडा सप्ताहाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/12/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

एरंडोल(प्रतिनीधी)- महाराष्ट्र राज्यात सर्वत्र दिनांक १२ डिसेंबर ते १८डिसेंबर फिट इंडिया मोहीम अंतर्गत महाराष्ट्र शासन तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे द्वारा प्राप्त सूचनेनुसार क्रीडा सप्ताह आजपासून सुरू करण्यात आला असून एरंडोल तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गालापुर याठिकाणी शाळा अंतर्गत छोट्या बालगोपाळांसाठी  क्रीडा स्पर्धांना आज प्रारंभ करण्यात आला. यावेळी सुनिल लक्ष्‍मण भिल, सुभाष भील, नरोत्तम  भिल,  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भिल शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक आणि शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर उपस्थित होते. यावेळी बोलताना किशोर पाटील कुंझरकर म्हणाले की २९ऑगस्ट २०१९ रोजी फिट इंडिया चळवळीचा प्रारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या शुभहस्ते झालेला आहे. राज्यात सर्वत्र खेळाचे वातावरण तयार व्हावे खिलाडूवृत्ती वाढावी तसेच सर्वांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी ही मोहीम अत्यंत उपयुक्त असून राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे क्रीडा सप्ताहास १२ डिसेंबर आजपासून राज्यभर प्रारंभ होत आहे. खेळामुळे मन प्रसन्न  होते प्रसन्न मनामुळे आरोग्य सुदृढ राहते सर्वांचे आरोग्य सुदृढ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी सर्वांनी विविध खेळांची कास धरण्याचे आवाहन देखील या निमित्ताने त्यांनी उद्घाटक म्हणून केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूनील  भिल होते. लिंबू चमचा स्पर्धा घेण्यात आली. शिवनेर सुरेश भील मुलांच्या गटात तर दुर्गा सुनील भील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. पुढे बोलताना शाळा स्तरीय स्पर्धेचे आयोजक तथा शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर म्हणाले की, जिल्हा परिषद मार्फत खेळ व शिक्षणा विषयाच्या सर्व योजना तळागाळात पोहचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जात असून जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग व तालुक्याचे शिक्षण विभागात द्वारे सर्वत्र या स्पर्धांना प्रारंभ करण्यात आलेला आहे. क्रीडा सप्ताह मुळे तंदुरुस्ती निर्माण होईल तंदुरुस्ती हा संस्कृती व परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे, खेळामध्ये करिअर करण्याची व खेळाविषयी आवड अभिरुची जोपासण्याची नवीन पिढीला संधी निर्माण होईल.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रगती विद्यामंदिरात रंगली वैयक्तिक गीत गायन स्पर्धा

Next Post

ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे ‘हॉलिडे वर्क’ चित्रप्रदर्शन- अशोक जैन

Next Post
ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे ‘हॉलिडे वर्क’ चित्रप्रदर्शन- अशोक जैन

ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे ‘हॉलिडे वर्क’ चित्रप्रदर्शन- अशोक जैन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo