Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गुलाबराव पाटील यांना विदगाव- फुपणी – गाढोदा परिसरातील शेकडो लाडक्या बहिणींनी केले औक्षण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
गुलाबराव पाटील यांना विदगाव- फुपणी – गाढोदा परिसरातील शेकडो लाडक्या बहिणींनी केले औक्षण

विदगाव /जळगाव-(प्रतिनिधी) – भाऊबीज हा सण बहिण-भावाच्या प्रेमळ नात्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, आणि यावर्षी, महायुतीचे उमेदवार व शिवसेना नेते, मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांना विदगाव- फुपणी – गाढोदा परिसरातील शेकडो लाडक्या बहिणींनी स्नेहपूर्वक औक्षण केले. गुलाबभाऊ आमच्यासाठी फक्त राजकीय नेते नाहीत, तर खरेखुरे भाऊ आहेत, ज्यांनी गावातील प्रत्येकाच्या हितासाठी आपले जीवन समर्पित केले आहे.’ ”या औक्षणाच्या सोहळ्यात बहिणींनी आपल्या गुलाब भाऊंच्या विजयाची प्रार्थना करत, “गुलाबभाऊंचा विजय हीच आमच्यासाठी भाऊबीजेची खरी भेट असेल,” असे सांगून “आम्ही सर्व बहिणी गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणार असल्याचे भावनिक उद्गार व्यक्त केले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. प्रमुख ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, रिपाईचे अनिल अडकमोल, महिला आघाडीच्या सरिता ताई कोल्हे – माळी आदी सोबत होते.

औक्षणाच्या या भावस्पर्शी सोहळ्यात गुलाबराव पाटील यांनी आपल्या बहिणींना दिलासा देत सांगितले, “तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. “लाडक्या बहिणींचा पाठींबा म्हणजे माझ्यासाठी 100% विजयाची गॅरंटी असल्याचे सांगितले. उपस्थित महिलांनी गुलाब भाऊंच्या वरचा आपुलकीचा भाव व्यक्त करत त्यांच्या समाजसेवेचे आणि निस्वार्थ कार्याचे कौतुक केले. यावेळी उपस्थित महिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले हिते.

शिवसेनेचे प्रभावी नेते गुलाबराव पाटील यांचा प्रचाराचा झंझावात विदगाव पंचायत समिती गणातील गाधोदा, देवगाव, फुपणी, नंदगाव, फेसर्डी, पिलखेडा, रिधुर, डीकसाई, विदगाव आवार, तुरखेडा या परिसरात संपन्न झाला. यावेळी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत मोठ्या संख्येने महिलांचा उस्फूर्त उत्साहाने सहभाग दिसून आला. यावेळी आमचा गुलाबभाऊ मोठ्या लिडने निवडून येणारच अशी चर्चा प्रचारा दरम्यान जेष्ठ नागरिक व महिला करत होते.

या प्रसंगी पं. स. सभापती ललिता ताई कोळी, जनाआप्पा कोळी, राजेंद्र कोळी, डॉ. कमलाकर पाटील, तालुकाध्यक्ष भूषण पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, राजू सोनवणे, मिलिंद चौधरी, संजय भोळे, सुदाम राजपूत, ललित बराटे, भाऊसाहेब पाटील, मनोहर पाटील, सचिन पवार, सेनेचे भरत बोरसे, मुरलीधर अण्णा पाटील, संदीप पाटील, विभाग प्रमुख गजानन सोनवणे, चुडामण कोळी, दिलीप जगताप भगवान कुंभार, बळराम कोळी, ईश्वर कोळी, मुरलीधर कोळी, पुंडलिक कोळी, सरपंच नितीन सपकाळे, जितू पाटील, सरपंच भगवान कोळी, निलेश सपकाळे, शालिक कोळी, राजेंद्र चौधरी, सुनील कोळी, संजय कोळी, भुवनेश्वर चव्हाण, चेतन पवार, नवल राजे पाटील, गुड्डू सपकाळे, बापू कोळी, नरेंद्र सपकाळे यांच्यासह विदगाव व परिसरातील महिलांसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आ.राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सुप्रीम कॉलनीतील शेकडो तरुणांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

Next Post

आध्यात्मिक साधनेमुळे आयुष्यात लाभते मनःशांती : आ. सुरेश (राजूमामा) भोळे

Next Post
आध्यात्मिक साधनेमुळे आयुष्यात लाभते मनःशांती : आ. सुरेश (राजूमामा) भोळे

आध्यात्मिक साधनेमुळे आयुष्यात लाभते मनःशांती : आ. सुरेश (राजूमामा) भोळे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo