Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चाळीसगांव तालुक्यातील सायगाव ते टाकळी प्र.दे. रस्त्याचे तिन-तेरा, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

चाळीसगाव-(किरण पाटील)- महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून गेली कित्येक दिवसांपासून ग्रामीण जनता या खराब झालेल्या रस्त्यांवरून वावरत आहे, याचा मोठा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. भारतास स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे झाली मात्र अजूनही ग्रामीण रस्त्यांच्या विकासाकडे पाहिले जात नाही. राज्यात महामार्गाच्या रस्त्यांचा चांगल्या प्रकारे विकास होताना दिसत आहे हे खरे आहे यात शंका नाही, मात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची खूप मोठी दुर्दशा झालेली असून यामुळे स्थानिक लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या कित्येक दिवसापासून ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास खुंटला आहे. वीस-पंचवीस किलोमीटर पर्यंत या रस्त्यांची दुरवस्था पाहायला मिळत आहे. सर्व रस्ते उधडलेल्या अवस्थेत आहेत. ग्रामीण भागात रस्त्यांची समस्या गंभीर स्वरूपाची आहे. परिसरातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दैनावस्था होऊन त्यावरून जाणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. गावामधील अंतर्गत रस्तेही उखडून माती बाहेर आली आहे तर काही ठिकाणी खड्डे तयार झालेत. त्या रस्त्यांना अधूनमधून मुरूमाची मलमपट्टी करण्याची प्रक्रिया सुरू असते. तर काही ठिकाणी तेही दिसत नाही. खड्यांच्या ठिकाणी वापरण्यात आलेला मुरूमही कमी प्रतीचा असतो म्हणून पावसाच्या पाण्यात रस्तेच वाहून जातात मग परिस्थिती ‘जैसे थे’ होते. अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे, ती सायगाव ते टाकळी प्र दे या एकूण १० किमी रस्त्याची. हा रस्ता पुर्ण उखडला गेला असून त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अत्यंत दुर्दैवी अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. या रस्त्यावर खड्डे चुकवताना लहान मोठे अपघात होत असल्याने या रस्त्यावरून जाताना लोकांना आपला जीव हा मुठीत घेऊन जाव लागत आहे. येथील लोकांना मणक्याचे, पाठदुखीचा, कमरेचा त्रास हा सहन करावा लागत आहे. मात्र बांधकाम विभाग याकडे डोळे बंद करून बसले आहे. याकडे बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे व रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी स्थानिक नागरिक,  वाहन धारक, प्रवाशी यांच्याकडून होत आहे. तसेच यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, असे येथील स्थानिक नागरिकांना वाटू लागले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

DCPS कपातीचा हिशोब मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शंन संघटनेचा २१ डिसेंबर रोजी घंटानाद आंदोलनाचा इशारा

Next Post

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी घेतली भेट

Next Post

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी घेतली भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo