Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा रशिया नदीत बुडून मृत्यू ; जिल्हा प्रशासनाचा दुतावासास संपर्क

पालकांचा तिथल्या यंत्रणेशी प्रशासनाने करून दिली बोलणी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
06/06/2024
in जळगाव, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा रशिया नदीत बुडून मृत्यू ; जिल्हा प्रशासनाचा दुतावासास संपर्क

जळगाव दि.6 ( जिमाका ) रशिया देशातील
यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये वैद्यकीय शाखेत शिकत असलेले जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी वोल्खोव्ह नदीच्या किनारी शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. त्यावेळी लाट येऊन त्यांचा त्यात बुडून मृत्यू झाला असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशिया येथील दुतावासातील कुमार गौरव ( आय.एफ.एस ) यांच्याशी संपर्क करून सर्व सर्व माहिती जाणून घेतली. तसेच निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांनी पालकांना तिथल्या प्रशासनाशी संपर्क करून दिला आहे.

प्राथमिक माहिती नुसार हर्षल अनंतराव देसले ( भडगाव ) , जिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी ( अमळनेर ) येथील विद्यार्थी रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. हे तिघे आणि त्यांचे सहअध्यायी विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या मोकळ्या वेळेत संध्याकाळी वोल्खोव्ह नदीच्या किनारी शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. त्यावेळी ही शोकांतिका अपघाती आणि अनपेक्षित घडल्याचे कळते.

सध्या रशियन फेडरेशनमधील सर्व संबंधित एजन्सीं पुढील कार्यवाही करत आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने विदेश मंत्रालयाशी संपर्क करून रशियातील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क केला. भारतीय दुतावासाने संबंधित विद्यापीठाशी संपर्क करून माहिती जाणून घेतल्याचे सांगितले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. पालकांना पूर्ण ते सहकार्य करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने भारतीय दुतावासच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

पर्यावरण दिनानिमित्त जैन इरिगेशनमध्ये पश्चिम आफ्रिकेतील पाहुण्यांच्याहस्ते वृक्षारोपण

Next Post

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo