Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव विमानसेवा लवकरच सुरळीत होणार, नाईट लँडिंग मंजुरीची कार्यवाही सुरू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगाव विमानसेवा लवकरच सुरळीत होणार, नाईट लँडिंग मंजुरीची कार्यवाही सुरू

खा. उन्मेश पाटील यांनी घेतली प्रधान सचिवांची भेट

जळगाव(प्रतिनीधी)- रात्रीचे विमानसेवा व खराब हवामाना मुळे अनेकदा विमानसेवेत बाधा निर्माण होत होती त्यातच गेल्या सप्ताहात विमानसेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती. यावर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी.आणि तातडीने उच्च दर्जाची विमानसेवा प्रवाशांना बहाल करता यावी यासाठी आज दिल्लीत नागरी विमान मंत्रालयाचे प्रधान सचिव प्रदीपसिंग खरोला यांची खासदार उन्मेश पाटील यांनी भेट घेतली असून रात्रीची विमानसेवा तसेच खराब हवामानात विमानसेवेसाठी सादर केलेल्या प्रस्तावास त्वरित मंजुरी देण्याची मागणी केली आहे. प्रधान सचिव प्रदीप खरोला यांनी कार्यवाही करण्याचे सूचित केले असून येत्या नऊ दिवसात उपकरणांच्या चाचणी साठी  तज्ञ समिती भेट देईल असे त्यांनी सांगितले असून  लवकरच जळगाव विमानसेवा सुरळीत होणार आहे असा विश्वास खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.तसेच, जळगाव विमानतळावर रात्रीच्या विमानसेवेसाठी आणि मुखत्वे खराब हवामानात विमानसेवा सुरळीत चालू राहावी यासाठी सेकंड सर्किट ऑफ रनवे,ग्रेडींग ऑफ रनवे बेसिक स्ट्रीट,पापीज तसेच इतर यंत्रणेची उभारणी सुरू आहे. येत्या नऊ दिवसात केंद्राच्या तज्ञांची तपासणी आणि चाचणी समिती भेट देईल अश्या सूचना संबधित विभागाला प्रधान सचिव यांनी दिल्या आहेत.जळगांव विमानतळावरून आवश्यक उपकरणांसह यंत्रणा अद्यावत करून मिळावी ही मागणी घेऊन गेल्या पंधरवाड्यात खासदार उन्मेश पाटील व खासदार रक्षाताई खडसे यांनी नागरी उड्डयन मंत्री ना. हरदीपसिंग पुरी यांची भेट घेतली व त्यांना निवेदनही दिले. त्यांनी सर्व समस्या समजून घेत नागरी विमानन महानिदेशक ( Director General Civil Avaition )  यांना आदेश दिले असून येत्या काळात पुणे व इंदोर विमानसेवा  सुरू होण्याबाबत आश्वस्त केले आहे. जळगाव येथील विमानसेवेबाबत असलेले सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे तात्काळ आदेश दिले आहे. यामुळे लवकरच जळगाव विमानतळावरून जळगावकरांना उच्च दर्जाची विमान सेवा अनुभवता येणार अशी आशा वाढली असतांना गेल्या सप्ताहात विमानसेवेत बाधा निर्माण झाली होती. त्यातच प्रवाश्यांचा चांगला प्रतिसाद असतांना दर्जेदार विमानसेवा मिळत नसल्याने जिल्हावासियांमध्ये  खासदार उन्मेश दादा पाटील यांनी भक्कम पाठपुरावा सुरू ठेवावा अशी मागणी जोर धरू लागली होती .आज त्यांनी प्रधान सचिव यांची भेट घेऊन कार्यवाही आत्ताच सुरू करावी अशी  मागणी केली. प्रधान सचिव खरोला यांनी लागलीच संबधित यंत्रणेला आदेश देत कमीतकमी कालावधीत काम मार्गी लावावे अशा सूचना दिल्या आहेत. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नोबल इंटरनॅशनल स्कुलमध्ये कवयित्री बहीणाबाई चौधरी व हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांना अभिवादन

Next Post

जामनेर तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र बनले लूटीचा अड्डा

Next Post

जामनेर तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र बनले लूटीचा अड्डा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d