Friday, June 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/06/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जळगाव-(जिमाका) -पाचोरा तालुक्यातील सर्व तालुकास्तरीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच विभागनिहाय अडचणी जाणून घेऊन त्या तातडीने सोडविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.

बैठकीत प्रशासकीय कामकाज, उपलब्ध मनुष्यबळ, इमारतींची स्थिती, वाहन व्यवस्थापन, कार्यालयीन सुविधा, कृषी नियोजन, पूरनियोजन, पाणीपुरवठा तसेच शैक्षणिक तयारी या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी आवश्यकतेनुसार प्रशासकीय कार्यवाही करणे, उपलब्ध संसाधनांचे योग्य नियोजन करणे, अपूर्ण व प्रलंबित कामांना गती देणे, आवश्यक दुरुस्ती व देखभाल करणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे, नागरिकाभिमुख सेवा वेळेत उपलब्ध करून देणे तसेच विभागीय समन्वयातून कामकाज अधिक परिणामकारक करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना राबविणे, शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून देणे, पूरग्रस्तांसाठी प्रस्तावित उपाययोजनांना गती देणे तसेच सुरू असलेल्या विकासकामांचा नियमित आढावा घेण्याबाबतही निर्देश देण्यात आले.
शिक्षण क्षेत्रातील तयारीचा आढावा घेताना नवीन शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे आणि गुणवत्तावाढीसाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.

नागरिकांच्या तक्रारी व सूचना थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठी जनसंवाद उपक्रमांतर्गत क्यूआर कोड प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. प्राप्त तक्रारींवर पंधरा दिवसांच्या आत स्मरणपत्र प्रणालीद्वारे कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

Next Post

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

संगीत नाटक अकादमीचे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर

संगीत नाटक अकादमीचे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.