Friday, June 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/06/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना अर्जांवर तत्परतेने कार्यवाहीचे निर्देश

जळगाव, दि. ११ (जिमाका) :जनतेच्या प्रश्नांचे निवारण करणे हेच प्रशासनाचे ध्येय असून जनसमाधान बैठकीत प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या विविध विषयांवरील समस्यांचे अर्ज संबंधित विभागांनी तात्काळ निकाली काढावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले.

नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी पाचोरा उपविभागीय कार्यालयात आयोजित ‘जनसमाधान बैठकी’त ते बोलत होते. यावेळी नागरिकांनी विविध विषयांवरील अर्ज सादर करून समस्या मांडल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक अर्जाची माहिती जाणून घेत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अर्जदारांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील, असा विश्वास त्यांनी अर्जदारांना दिला.

बैठकीस उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे, भडगाव तहसीलदार शितल सोलाट यांच्यासह कृषी, आरोग्य, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण, महिला व बाल विकास, जिल्हा परिषद आणि पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी सांगितले की, बैठकीत प्राप्त सर्व अर्ज संबंधित विभागांकडे पाठविण्यात येतील आणि त्यावर त्यांनी निर्णय घेऊन अर्जदारांना तात्काळ माहिती यावी. या बैठकीत त्यांनी सुमारे तीन तास उपस्थित राहून १०० हून अधिक अर्जदारांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या.

जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या, दैनंदिन प्रशासकीय प्रश्न, अडीअडचणी आणि तक्रारींचे स्थानिक स्तरावर गतीने, समन्वयाने व कालबद्ध निवारण व्हावे या उद्देशाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून उपविभाग स्तरावर ‘जनसमाधान बैठक’ हा लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी दर गुरुवारी संबंधित उपविभागीय कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेतात. त्यामुळे नागरिकांना शासनस्तरावर प्रलंबित विषयांसाठी जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज कमी होणार असून स्थानिक स्तरावरच निराकरणाची प्रक्रिया वेगवान होणार आहे.

पारदर्शकता व कार्यक्षमतेसाठी बैठकीत प्राप्त प्रत्येक अर्जाचे तात्काळ स्कॅनिंग करून ‘जनसमाधान पोर्टल’वर नोंद करण्यात येते. प्रत्येक अर्जास क्यूआर कोड देण्यात येत असून त्याद्वारे अर्जावरील कार्यवाहीचा मागोवा घेणे आणि अर्जाची स्थिती ऑनलाइन पाहणे नागरिकांना शक्य होणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

संगीत नाटक अकादमीचे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर

संगीत नाटक अकादमीचे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर

विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी ;नेस्लेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत जैन इरिगेशन, गांधी रिसर्च फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी ;नेस्लेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत जैन इरिगेशन, गांधी रिसर्च फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo