Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक संपन्न

जिल्ह्यात अंत्योदय योजनेत 5 हजार शिधापत्रिका तर प्राधान्य कुटूंब लाभार्थींमध्ये 80 हजार लाभार्थ्यांचामावेश करण्यात येणार

जळगाव, (जिमाका) दि. 4 – जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत स्वस्त धान्य दुकानातील धान्य मिळालेच पाहिजे, यासाठी सर्व स्वस्त धान्य दुकानांवर पुरवठा विभागाचे नियंत्रण व लक्ष आहे. जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहचवताना काही अनियमितता आढळल्यास त्या दुकान मालकांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या मासिक बैठकीत दिली.

            याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मेघराज राठोड, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, यांचेसह समितीचे सदस्य व जिल्हा पुरवठा शाखेतील कर्मचारी आदि उपस्थित होते.

            यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी पुढे म्हणाले की, अंत्योदय योजनेचा लाभ योग्य  लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी त्या योजनेचा लाभार्थी निवडताना शासनाच्या आवश्यक सुचनांची दक्षता घेण्यात येत आहे. कोणत्याही गरजू लाभार्थी अंत्योदय योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी पुरवठा विभाग आवश्यक ती कार्यवाही करीत असल्याचेही सुर्यवंशी यांनी याप्रसंगी सांगितले. जिल्ह्यात अंत्योदय योजनेत अजून 5 हजार शिधापत्रिका तर प्राधान्य कुटूंब लाभार्थीमध्ये 80 हजार लाभार्थ्यांचा समावेश करता येणार असून लाभार्थी निवडताना पारदर्शीपणा राखला जाणार असल्याचेही श्री. सुर्यवंशी यांनी बैठकीत सांगितले. 

            जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे 1 लाख 37 हजार 748, प्राधान्य कुटूंब लाभार्थी 4 लाख 70 हजार 299, एपीएल 3 लाख 12 हजार 649 तर शुभ्र रेशनकार्डधारक 74 हजार 457 असे एकूण 9 लाख 95 हजार 147 लाभार्थी आहेत. तर जिल्ह्यात 1 हजार 938 रास्त भाव दुकाने आहेत. त्यापैकी 1 हजार 791 दुकाने कार्यान्वित आहेत तर 147 दुकाने अकार्यान्वित असून अकार्यान्वित दुकाने कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यात ऑनलाईन पध्दतीने धान्य वितरण होत असल्याने मोठ्या प्रमाणात धान्याची बचत झाल्याची माहितीही श्री. सुर्यवंशी यांनी बैठकीत दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगर सार्वजनिक उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मिलिंद सोनवणे यांची एकमताने निवड

Next Post

शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या मुलभूत सोयी-सुविधांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे -जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

Next Post

शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या मुलभूत सोयी-सुविधांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे -जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo