Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा परिषद शाळांमध्ये आठवड्यातून दोन वेळा सामुदायिक कवायत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/11/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
जिल्हा परिषद शाळांमध्ये आठवड्यातून दोन वेळा सामुदायिक कवायत

विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी रावेर पंचायत समिती शिक्षण विभागाचा निर्णय 

रावेर(प्रतिनीधी)- येथील पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवड्यातून दोन दिवस सामुदायिक कवायत नियमित घेण्याची सूचना शाळांना देण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त, स्वच्छता, व्यायामाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी विजय एस. पवार यांनी सांगितले. रावेर तालुक्यात शिक्षण विभाग अंतर्गत  चौदा केंद्रातील एकूण १४९ शाळांना यात सहभागी करण्यात आले असून सुमारे पंधरा हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत  आहे. बैठे कवायत पाच प्रकार आणि उभे कवायत आठ प्रकार यामध्ये विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात  येत आहे. सामुदायिक कवायत  उपक्रम नियमित व उत्कृष्ट पद्धतीने राबविणाऱ्या शाळांचा प्रजासत्ताक दिनी गौरव करण्यात येणार असल्याची माहिती रावेर पंचायत समिती शिक्षण विभागातून देण्यात आली आहे. यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी नवाज तडवी,  शिक्षण विस्तार अधिकारी नईम शेख आणि सर्व केंद्र प्रमुख यांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी घेतली भेट

Next Post

प्रगती विद्यामंदिरात विज्ञान प्रदर्शन कार्यशाळा संपन्न

Next Post

प्रगती विद्यामंदिरात विज्ञान प्रदर्शन कार्यशाळा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo