Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 71 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
उपचाराच्या पुरेशा सोयी असलेल्या खाजगी रुग्णालयांनाच म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शन मिळणार


जळगाव, (जिमाका) दि. 10 – जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत असून नागरीकांच्या लसीकरणासही वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 40 हजार 89 नागरीकांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 1 लाख 31 हजार 400 नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला असून आतापर्यंत एकूण 5 लाख 71 हजार 489 लाभार्थ्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.


जिल्ह्यात 16 जानेवारी, 2021 रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर 5 फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 45 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील 45 वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालयातूनही नागरीकांना कोरोनाची लस देण्यात आली. तर 1 मे ते 11 मेपर्यंत जिल्ह्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरीकांचेही लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन व जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी पुढे आल्याने जिल्ह्यात लसीकरणास वेग आला आहे.

तालुकानिहाय व आरोग्य केंद्रनिहाय लसीकरण लाभार्थी माहिती
(कंसात दुसरा डोस घेणारे लाभार्थी संख्या)


अमळनेर तालुक्यात 10 हजार 133 लाभार्थ्यांना पहिला डोस तर 4 हजार 410 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. भुसावळ 35861 (14768), बोदवड 4015 (1198), भडगाव 5853 (1982), चाळीसगाव 9691 (3377), चोपडा 7861 (2288), धरणगाव 5603 (1668), एरंडोल 5186 (1853), जामनेर 7867 (4351), मुक्ताईनगर 5554 (1979), पाचोरा 9275 (3466), पारोळा 6169 (2656), रावेर 10628 (4277), यावल 9788 (4483), जळगाव 74607 (23085), प्राथमिक आरोग्य केंद्र 1 लाख 52 हजार 270 (40416), प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 35889 (4504), प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील खाजगी रुग्णालये 39896 (9379), विश्वप्रभा खाजगी रुग्णालय 3943 (1260) याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 40 हजार 89 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 1 लाख 31 हजार 400 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आल्याचेही डॉ जमादार यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘द फॅमिली मॅन 2’ साठी मनोज वाजपेयीने घेतलेले मानधन वाचून बसेल धक्का

Next Post

मालाड मालवणी इमारत दुर्घटना : मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

Next Post
मालाड मालवणी इमारत दुर्घटना : मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

मालाड मालवणी इमारत दुर्घटना : मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo