Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन इरिगेशनतर्फे एसटी कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जैन इरिगेशनतर्फे एसटी कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी वाटप

स्नेहाच्या शिदोरी वाटपाप्रसंगी एसटी महामंडळाचे कर्मचारी सोबत (डावीकडून) विजय पाटील, अरविंद देशपांडे, नितीन लढ्ढा, अनिष शहा, अनिल जोशी.


जळगाव दि.22, प्रतिनिधी – कोरोनाकाळासह संकटसमयी तसेच नेहमीच जळगावकरांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीतर्फे एसटी महामंडळाच्या 200 कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी याउपक्रमांर्तगत सुमारे महिनाभर पुरेल एवढे किराणा साहित्य वाटप करण्यात आले.


कांताई सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर माजी महापौर नितीन लढ्ढा, बांधकाम व्यावसायीक अनिष शहा, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने विजय पाटील, जैन स्पोर्टस् अॅकडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, जैन इरिगेशनचे मीडीया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी उपस्थित होते. माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी मनोगत व्यक्त करताना जैन इरिगेशनतर्फे सुरू असलेल्या कोरोना काळासह विविध समाजपयोगी कार्याची माहिती दिली. जैन उद्योग समूहाव्दारे गरजुंची भोजनाची व्यवस्था असो की, शहरातील कोणतेही समाजपयोगी कार्य असो जैन उद्योग समूह नेहमी अग्रेसर असतो. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या दातृत्व भावनेतुन स्नेहाची शिदोरी हा उपक्रम सुरू असुन आवश्यकता असणाऱ्यांसाठी तो अपेक्षापूर्तीचा ठरत असल्याचे नितीन लढ्ढा म्हणाले.

संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो मात्र संघर्षाच्या काळात मदतीचा हात देणारे खरे औदार्याचे धनी असतात. एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने विजय पाटील यांनी आपल्या व्यथा व्यक्त करताना अशोक जैन यांच्याकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार होत नसल्याने संभाव्य उपासमारीचे गांभीर्य सांगितले त्यानुसार त्यांनी तत्काळ मदतीचा हात दिल्याचे विजय पाटील कृतज्ञतापुर्वक म्हणाले. या एसटीच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांची मोफत नेत्रतपासणी करण्याची घोषणा यापुर्वीच केली आहे. जैन स्पोर्टस् अॅकडमीचे
समन्वयक अरविंद देशपांडे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जैन इरिगेशनचे अनिल जोशी यांनी स्नेहाची शिदोरी या उपक्रमाविषयी अवगत करत आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी जैन स्पोर्टस ॲकडमीच्या सहकारी यांनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात ४२८ कोरोना बाधित रुग्ण ;जिल्हानिहाय आकडेवारी

Next Post

सामजिक संस्था जळगाव जिल्हा आढावा बैठक संपन्न

Next Post
सामजिक संस्था जळगाव जिल्हा आढावा बैठक संपन्न

सामजिक संस्था जळगाव जिल्हा आढावा बैठक संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo