Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/06/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जळगाव-(प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY) या महत्त्वाकांक्षी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर 19 जून रोजी देशभरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO), जळगाव कार्यालयातर्फे जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या जैन हिल्समधील गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृह येथे उद्या दि. 19 ला संध्याकाळी 4 वाजेला विकसीत भारत या संकल्पनेतून पीएम-व्हीबीआरवाय ह्या योजनेतील विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे ₹2,400 कोटींचे प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना (डीबीटी) द्वारे हस्तांरीत केले जाणार आहे.

जळगाव येथील कर्मचारी भविष्य निधी संघटनेतर्फे प्रादेशिक कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमास महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटिल, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ, जळगावचे आमदार सुरेश भोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. त्यांच्यासोबत विभागीय भविष्य निधी आयुक्त-2 मनोज कोळी, सहाय्यक भविष्य निधी आयुक्त मोहित दीक्षित उपस्थीत राहणार आहेत. या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी, नियोक्ते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात केंद्रीय कामगार व रोजगार तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे उपस्थीत असतील. पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे ₹2,400 कोटींचे प्रोत्साहन अनुदान थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने वितरित केले जाईल. या माध्यमातून देशभरातील 15 लाखांहून अधिक नागरिकांना अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध होण्यास चालना मिळणार आहे. PM-VBRY ही रोजगारनिर्मितीला चालना देणारी केंद्र सरकारची रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजना असून, प्रथमच संघटित क्षेत्रात रोजगार मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या वेतनाएवढी, कमाल ₹15 हजारांची मदत दिली जाते. तसेच अतिरिक्त रोजगार निर्माण करणाऱ्या नियोक्त्यांनाही प्रोत्साहन अनुदान दिले जाते. देशभरात दोन वर्षांत 3.5 कोटींहून अधिक रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट या योजनेसमोर ठेवण्यात आले आहे. पुणे क्षेत्रात या योजनेअंतर्गत आतापर्यंत 75,711 कर्मचाऱ्यांना ₹42.79 कोटींपेक्षा अधिक लाभ, तर 6,351 नियोक्त्यांना ₹145.16 कोटींपेक्षा अधिक प्रोत्साहन वितरित करण्यात आले आहे. देशभरातील 200 ठिकाणी एकाचवेळी होणाऱ्या या कार्यक्रमात 9 हजार नियोक्ता प्रतिनिधी आणि 45 हजार कर्मचारी सहभागी होतील. कार्यक्रमांमुळे रोजगार निर्मिती, रोजगाराला प्रोत्साहन आणि सामाजिक सुरक्षेचा विस्तार या केंद्र सरकारच्या उद्दिष्टांना अधिक बळ मिळेल, जैन हिल्स येथे होणाऱ्या कार्यक्रमात जळगाव कर्मचारी भविष्य निधी संघटनेतील प्रादेशिक परिसरातील लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय भविष्य निधी आयुक्त-2 मनोज कोळी, सहाय्यक भविष्य निधी आयुक्त मोहित दीक्षित यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

Next Post

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo