Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/06/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

परिश्रम हॉलमध्ये गट चर्चेत सहभागी फालीचे विद्यार्थी, शेतकरी व कंपनी प्रतिनिधी

जळगाव-प्रतिनिधी – हवामान बदलासह मानवनिर्मित आपत्तींमुळे शेती ही न परवडणारी होत आहे, ही नकारात्मकता तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती केल्यास बदलू शकते, मागील काही वर्षात शेतीमध्ये खूपच बदल झाले आहेत, यातून भारताचे विकसीत होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. मुलांमध्ये नेतृत्व कौशल्य विकसित करणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) हे आधुनिक कृषीक्षेत्राचे ‘पॉवर ऑफ हाऊस’ म्हणून पुढे येत आहे असा सुर उद्योजक प्रतिनिधी, शेतकरी व फाली मधील विद्यार्थी यांच्यात झालेल्या संवादात उमटला.
जैन हिल्स येथे फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया च्या १२ व्या वार्षिक अधिवेशनातील अंतिम टप्प्याची आज सुरवात झाली. शिवार फेरीत टिश्यूकल्चर रोपांचे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी जैन हायटेक प्लॉन्ट फॅक्टरी, टिश्यूकल्चर लॅब, प्रक्रिया उद्योग समजण्यासाठी जैन फार्मफ्रेश फूडच्या कांदा निर्जीलकरण प्रकल्प, आंबा प्रक्रिया प्रकल्पा सह अन्य विभागांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्यात. यानंतर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘खोज गांधीजी की’ या ऑडिओ गाईडेड संग्राहलयातून महात्मा गांधीजींचे विचार आत्मसात केले. भविष्यातील शेती म्हणजे माती विरहित शेती ‘फ्यूचर फार्मिंग’, हायड्रोपोनिक फार्मिक अनुभवली. यानंतर झालेल्या गट चर्चेत शेतकरी, उद्योजकीय प्रतिनिधींशी फालीच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधला. परिश्रम व आकाश ग्राऊंडवर झालेल्या चर्चेत शेतकरी नारायण पाचपांडे, उमाकांत भारंबे, सागर पाटील, पंकज घाटे, भागवत बाजीराव पाटील, विशाल पाटील, क्रिष्णा पाटील यांच्यासोबत विद्यार्थी गौरी त्रिपाठी, श्रृती चौहान, सिद्धी गावकर, शिवा देवसाकर, सेजल पाटील, प्राजक्ता भार्गव यांच्यासह विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यात त्यांनी कार्बन क्रेडिट शेती, महिलांचे शेतीमधील योगदान, ठिबक सिंचनच्या माध्यमातून पाणी बचत व खतांचा कार्यक्षमतेने वापर, टिश्यूकल्चर तंत्रज्ञानातून निर्यातक्षम उत्पादन, प्रक्रिया उद्योगवाढीसाठी लागणारे घटक, पोल्ट्रीउद्योग, ऑटोमेशन व आर्टिफेशियल तंत्रज्ञामुळे शेतीतील बदल, उत्पादन ते ट्रेडिंग पर्यंतची साखळी यासह नवनविन कृषी उद्योजकीय कल्पनांवर चर्चा करण्यात आली. प्रश्नोत्तरातून फालीच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांकडून शेतीमधील बारकावे तसेच आव्हाने आणि त्यावर मात करण्यासाठी लागणारे कौशल्य समजून घेतले. आकाश ग्राऊंड येथे झालेल्या शेतकरी संवादाचे सुत्रसंचालन जुली पटेल यांनी केले. तर परिश्रम हॉल येथे झालेल्या गट चर्चेचे समन्वयन शाबोर्नी पोद्दार यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

Next Post

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात 'आंतरराष्ट्रीय योग दिन' उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo