Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ज्ञानवर्धिनी फाउंडेशनतर्फे स्वयंरोजगार प्रशिक्षण;३० महिलांनी घेतला प्रशिक्षणाचा लाभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
ज्ञानवर्धिनी फाउंडेशनतर्फे स्वयंरोजगार प्रशिक्षण;३० महिलांनी घेतला प्रशिक्षणाचा लाभ

अमळनेर-(प्रतिनिधी)-महिलाही सर्वांगिण दृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी नेहमी तत्पर असणारी अमळनेर येथील सेवाभावी संस्था ज्ञानवर्धिनी फाउंडेशनतर्फे दि. ११ व १२ सप्टेंबर रोजी स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यात ३० महिलांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदवत प्रशिक्षणाचा लाभ घेतला.पहिल्या दिवशी हिरालाल पाटील आणि संजय पाटील यांनी महिलांना गृह उद्योग करताना येणाऱ्या समस्या, त्यावरील उपाय तसेच शासनाच्या विविध योजनांविषयी तर राजश्री पाटील यांनी महिलांसाठीचे प्रेरक स्त्रोत याविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र उद्योजकता विकास प्रशिक्षण केंद्र जळगावचे प्रशिक्षक समन्वयक विजय सैंदाणे यांनी उपस्थित महिलांना  मेणबत्ती, फिनाइल, वॉशिंग पावडर आणि द्रव साबण कसा तयार करावा याचे प्रशिक्षण दिले. शिवाय गृहउद्योगासाठी कच्चा माल कुठून आणावा, तयार केलेला माल कसा आणि कुठे विकावा तसेच उद्योग उभारणीसाठी कर्ज कसे मिळवावे याबाबतही मार्गदर्शन केले.प्रास्तविक आणि सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोपान भवरे, सचिन अहिरे, अनिता मोरे यांनी प्रयत्न केले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

निधन वार्ता-हिराबाई यादव

Next Post

के सी ई सोसायटीचे अध्यापक विद्यालयात राष्ट्रभाषा हिंदी दिन साजरा

Next Post

के सी ई सोसायटीचे अध्यापक विद्यालयात राष्ट्रभाषा हिंदी दिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo