Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात महाआरोग्य शिबिराच्या दोन दिवसात दिडशे रुग्णांची नोंद; उद्या समारोप

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
07/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात महाआरोग्य शिबिरास प्रारंभ एमडी मेडिसीन व एमसीएच तज्ञांकडून तपासणी व शस्त्रक्रिया; पहिल्याची दिवशी ५५ रुग्णांची नोंदणी

जळगाव(प्रतिनिधी)- गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव तथा स्त्रीरोग तज्ञ डॉ.वर्षा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्‍त आयोजित मोफत शस्त्रक्रिया आणि महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी दोन दिवसात दिडशे रुग्णांची नावनोंदणी करण्यात आली आहे. उद्या ८ ऑक्टोंबर रोजी नावनोंदणीचा समारोप होईल.

शनिवार, ९ ऑक्टोंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे गरजु रूग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया आणि महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराच्या दुसर्‍या दिवशीही रुग्णांनी नावनोंदणीस प्रतिसाद दिला असून उपस्थीत सर्वच रुग्णांची नोंदणी करुन घेण्यात आली. याप्रसंगी कोविड नियमांचे पालन करण्यात आले.

शनिवार, ९ ऑक्टोंबरपासून मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. तरी रुग्णांनी या महाशिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.उल्हास पाटील रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

या महाशिबीरात मुतखडा, नाक-कान-घसा शस्त्रक्रिया, कॅन्सरच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहे. तसेच जनरल मेडीसीन महाआरोग्य शिबीरात किडनीचे आजार, ब्रेन हॅमरेज, मेंदूज्वर, फुफ्फुसाचे आजार, न्युमोनिया, दमा, क्षयरोग, विषबाधा, लिव्हर, मलेरीया, मोफत डायलेसीसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मेडीसीन शिबीरात ब्रेम हॅमरेजशी संबंधीत उपचारासाठी रूग्णालयात भरती झालेल्या रूग्णांची एमआरआय तपासणी सवलतीत केली जात आहे.

या महाशिबीरात एमसीएच तज्ञ डॉक्टरांकडुन रूग्णांची तपासणी देखील मोफत केली जात आहे. ह्या शिबिरातील नावनोंदणीचा आज समारोप होणार असून शस्त्रक्रिया ९ ऑक्टोबरपासून सुरु होतील. महाशिबीरासाठी विभागनिहाय स्वतंत्र टिम कार्यरत करण्यात आल्या आहेत. रूग्णांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली असुन त्यामुळे शिबीराचा लाभ घेण्यासाठी गरजु रूग्णांनी त्वरीत आशिष भिरूड ९३७३३५०००९ आणि रत्नशेखर जैन ७०३०५७११११ या क्रमांकावर संपर्क साधुन आजच नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहन रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात रिद्धी, सिद्धीच्या डोळ्यांवर यशस्वी लेजर उपचार; रेटिना तज्ञ डॉ.अश्‍विनी पाटील यांनी घेतले परिश्रम

Next Post

जिल्ह्यात उद्यापासून “मिशन कवच कुंडल” मोहीम; नागरीकांनी लसीकरण करुन घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post
जिल्ह्यात उद्यापासून “मिशन कवच कुंडल” मोहीम; नागरीकांनी लसीकरण करुन घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्ह्यात उद्यापासून "मिशन कवच कुंडल" मोहीम; नागरीकांनी लसीकरण करुन घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo