Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी : युवकांच्या मोठ्या सहभागात महायुतीच्या रॅलीला प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची  आतिषबाजी : युवकांच्या मोठ्या सहभागात महायुतीच्या रॅलीला प्रतिसाद

आ.राजूमामा भोळे यांनी घेतले बळीराम पेठ, शनिपेठ, समता नगर, छ.संभाजीनगर, नेहरू नगर भागात नागरिकांचे आशीर्वाद

जळगाव – (प्रतिनिधी) – ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत, युवकांच्या मोठ्या सहभागाने भाजप शिवसेना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी दि. १७ नोव्हेंबर रोजी दिवसभरात बळीराम पेठ, शनिपेठ, छ.संभाजीनगर, समता नगर, नेहरूनगर भागात रॅली काढली. यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी नागरिकांना अभिवादन करीत त्यांचे आशीर्वाद घेतले व भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

सकाळी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात आ. राजूमामा भोळे यांनी जिल्हा परिषदेच्या पत्र्या हनुमान मंदिर येथून प्रचार सुरु केला. त्यानंतर तहसील कार्यालय गल्ली, ब्राह्मण सभा गल्ली, गुरुनानक नगर, काट्या फाईल, गवळीवाडा, बळीराम पेठ मार्गे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या घरी भेट देऊन समारोप केला. दरम्यान, आ. राजूमामा भोळे यांनी माजी उप महापौर करीम सालार, दिवंगत हाजी गफार मलिक यांच्या घरी भेट दिली.मार्गात नागरिकांनी पुष्पहार घालून, महिला भगिनींनी औक्षण करीत भरभरून आशीर्वाद दिले.

तर दुपारी दुसऱ्या टप्प्यात समता नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून प्रचार रॅली काढली. तेथून देवेंद्र नगर परिसर, संभाजी नगर, नित्यानंद नगर, त्र्यंबक नगर परिसर, मोहन नगर, नेहरू नगर मार्गे जीवन मोती सोसायटी येथे समारोप करण्यात आला. मार्गात जेष्ठ नागरिकांशी भेटीगाठी करून महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी राहण्याचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आवाहन केले.

दोन्ही रॅलीत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भारतीताई सोनवणे, चेतन सनकत, मुकुंदा सोनवणे, जितेंद्र मराठे, सुरेखा तायडे, शिवसेनेचे ज्योती चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख फिरोज शेख, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, भाजप मंडळ क्रमांक २ चे अध्यक्ष राहुल घोरपडे, मंडळ क्र. ९ चे अध्यक्ष महेश कापूरे, भाजप अल्पसंख्याक महानगराध्यक्ष अशफाक खाटीक, जगदीश नेवे, कल्पेश सोनवणे, नीलेश तायडे, शुभम तायडे, शालिक सपकाळे, संदीप ढंढोरे, प्रमोद नगरकर, उदय भालेराव, प्रमोद नगरकर, सचिन दुनाखे, अश्विन भोळे, ललित भोळे, रुपेश पाटील, आशिष जोगी, ललित परदेशी, गजानन परदेशी, प्रेमल पटेल, सुरज पवार, अशोक ढंढोरे, सुभाष बेंडवाल, सुभाष जावळे, माणिकचंदजी जावळे, कल्लू बारसे, संजय ढंढोरे, सुभाष चव्हाण, शिवसेनेचे पियुष कोल्हे, कुंदन काळे, स्वप्नील परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साजिद पठाण, कौसर काकर, अर्चना कदम, ममता तडवी, शोभा भोईटे, फैजान पटेल, कामिल शेख, रिपाई (आठवले) गटाचे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, मिलिंद सोनवणे, प्रताप बनसोडे, नाना भालेराव, अक्षय मेघे, लोक जनशक्ती पक्षाचे मनोज निकम, आनंदा सोनवणे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वायफळ बडबड करणाऱ्या पेक्षा जनता काम करणाऱ्याला साथ देईल;पिंप्री येथील जाहीर सभेत गुलाबराव पाटील यांना विश्वास

Next Post

ओरिऑन स्टेट बोर्ड स्कूलचा तनिष्क कळेल याची राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत चमकदार कामगिरी

Next Post
ओरिऑन स्टेट बोर्ड स्कूलचा तनिष्क कळेल याची राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत चमकदार कामगिरी

ओरिऑन स्टेट बोर्ड स्कूलचा तनिष्क कळेल याची राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत चमकदार कामगिरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo