Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींना 24 तासांच्या आत अटक; जिल्हाधिकारींनी दिले कडक कारवाईचे आदेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/12/2024
in जळगाव, विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 20 (जिमाका)-  धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे गिरणा नदीतून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर गुरुवारी  मध्यरात्री अडीचच्या सुमारास  वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात आरोपी आबा ईश्वर कोळी, योगेश ईश्वर कोळी, दिनेश सोमा कोळी, गणेश सोमा कोळी यांनी तलाठी दत्तात्रय पाटील यांच्यावर हल्ला चढवला ज्यात त्यांच्या पायावर फावड्याने वार केल्यामुळे फॅक्चर झाले आहे. या घटनेत तलाठी दत्तात्रय पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी नायब तहसीलदार संदीप मोरे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून कलम 109, 132, 121(2), 303(2) 112(2), 189(2), 191, 190 प्रमाणे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सुचना जिल्हा पोलिस अधिक्षक मा. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व पाळधी दुरक्षेत्र धरणगाव पोलीसांनी चोविस तासाच्या आत गुन्हयातील आरोपी आबा ईश्वर कोळी, योगेश ईश्वर कोळी, दिनेश सोमा कोळी, गणेश सोमा कोळी यांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच गुन्ह्यात वापरलेले 2 ट्रॅक्टर सुद्धा जप्त करण्यात आले आहे.

प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत वाळू माफियांन विरोधात प्रशासन अधिक कठोर पावले उचलणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील सर्व मंत्री, विभागीय आयुक्त यांनी या घटनेची गंभीर दखल घेत योग्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

सोयाबीन व भरडधान्य खरेदीच्या नोंदणीसाठी शासनाकडून ३१ डिसेबरपर्यंत मुदतवाढ

Next Post
सोयाबीन व भरडधान्य खरेदीच्या नोंदणीसाठी शासनाकडून ३१ डिसेबरपर्यंत मुदतवाढ

सोयाबीन व भरडधान्य खरेदीच्या नोंदणीसाठी शासनाकडून ३१ डिसेबरपर्यंत मुदतवाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo