Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सोयाबीन व भरडधान्य खरेदीच्या नोंदणीसाठी शासनाकडून ३१ डिसेबरपर्यंत मुदतवाढ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/12/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
सोयाबीन व भरडधान्य खरेदीच्या नोंदणीसाठी शासनाकडून ३१ डिसेबरपर्यंत मुदतवाढ

जळगाव- (जिमाका)- किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०२४-२५ ज्वारी, मका व बाजरी (भरडधान्य) खरेदी करीता जळगाव जिल्ह्यात पणन महासंघाअंतर्गत एकूण १८ खरेदी केंद्र कार्यरत आहे.  यात अमळनेर, पारोळा, चोपडा, एरंडोल, धरणगांव, पाळधी, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुणीं, पाचोरा, भडगाव व चाळीसगाव  याठिकाणी खरेदी केंद्र कार्यरत आहे.

मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, जिल्ह्यातील सर्व आमदार,विभागीय संचालक,  उपाध्यक्ष श्री. रोहित दिलीपराव निकम, तसेच संचालक श्री. संजय मुरलीधर पवार यांच्या प्रयत्नाने सोयाबीन व भरडधान्य खरेदीच्या नोंदणीसाठी शासनाकडून मुदतवाढ प्राप्त झालेली आहे.

भरडधान्य व सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी ३१ डिसेबरपर्यंत शेतकरी नोंदणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ऑनलाईन नोंदणी करीता शेतकऱ्यांना आधारकार्ड, बँक पासबूक व ऑनलाईन पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा, ८अ इ कागदपत्रे आवश्यक आहे. २०२४-२५ चे हमीभाव  ज्वारी (हायब्रीड) ३३७१ रुपये, मका २२२५ रुपये,  बाजरी २६२५ रुपये,  सोयाबीन ४८९२ रुपये आहेत.

भरडधान्य खरेदीसाठी संबंधीत शेतक-यांनी खरेदी केंद्रावर लाईव्ह फोटो देवून नोंदणी पूर्ण करावी आणि शेतकरी बंधुंनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एस. एस. मेने यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींना 24 तासांच्या आत अटक; जिल्हाधिकारींनी दिले कडक कारवाईचे आदेश

Next Post

महाऊर्जास ऊर्जा संवर्धनासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान आणि देशात राज्याला प्रथम स्थान

Next Post
महाऊर्जास ऊर्जा संवर्धनासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान आणि देशात राज्याला प्रथम स्थान

महाऊर्जास ऊर्जा संवर्धनासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान आणि देशात राज्याला प्रथम स्थान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo