Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तृतीयपंथीयांच्या विकास योजनांसाठी समाज कल्याण विभागाचा पुढाकार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विशेष शिबीराचे आयोजन-समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/05/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) –  सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय  व्यक्तीसाठी  National Portal For Transgender Persons –https:transgender.dosje.gov.in  राष्ट्रीय पोर्टल सुरु  करण्यात आले आहे. सदर पोर्टलवर तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळणेसाठी अर्ज करण्याबाबतची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र सदर पोर्टलवर नोंदणी करण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. त्यामुळे राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तींची निश्चित आकडेवारी उपलब्ध होत नसल्याने त्यांचेसाठी नाविन्यपूर्ण व कौशल्य विकासाच्या योजना राबविण्यास अडचणी निर्माण होत आहे. ही बाब लक्षत घेऊन राज्याच्या समाज कल्याण विभागाने आता यासाठी पुढाकार घेतला आहे.

          राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिनांक 23 मे, 2022 ते  14 जुन 2022 या कालावधीत विशेष शिबीराचे आयोजन करण्याच्या सुचना समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नुकत्याच दिल्या आहेत. सदर विशेष शिबीरात तृतीयपंथीय व्यक्तीची सदर पोर्टलवर नोंदणी करण्याबरोबरच तृतीयपंथीय व्यक्तींना तात्काळ प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करणेबाबत सुचित करण्यात आले आहे. नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक 30 मे, 2022 ते 3 जून, 2022 या दरम्यान तर जळगाव येथे दिनांक 1 जून, 2022 रोजी हे विशेष शिबिर होणार आहे. तृतीयपंथी यांचे हक्कांचे संरक्षण व कल्याण योजनेंतर्गत त्यांच्या विकासासाठी, तसेच त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, उपाययोजनांची माहिती व्हावी व जनजागृती करणे इत्यादींसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत तसेच प्रशासनाच्यावतीने तृतीयपंथीयांसाठी सांस्कृतिक संम्मेलन/ कार्यशाळा आयोजित करणेसाठी प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग (सर्व) यांचेमार्फत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण (संबंधीत) यांना निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. समाज कल्याण आयुक्तालय, पुणे येथे तृतीयपंथी समुहाचे सामाजिक सहभाग, स्वावलंबन, आरोग्य, स्वयंरोजगार नोंदणी, यावर नुकताच संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुणेरी प्राईड संस्था, मैत्र क्लिनिक, गायत्री परिवाराचे प्रतिनिधी यांनी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थान, आयुष विभाग, आरोग्य मंत्रालय भारत सरकार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे, इस्कॉन शोध आरंभ रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन, पुणे व श्री संत जगदगुरु संत तुकाराम फाउंडेशन फोर फिलांथ्रोपी हे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये तृतीयपंथीयांची नोंदणी करणे, याबाबत प्रथम प्राधान्य देवून सदर नोंदणीसाठी विशेष उपक्रम घेऊन त्यांची नोंदणी करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आयुक्त समाज कल्याण यांनी निर्देश दिले आहेत. स्वयंसेवी संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी यांचे सहाय्याने प्रत्येक जिल्ह्यात एकदिवशीय शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

          चौकट राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तीची निश्चित आकडेवारी (माहिती) उपलब्ध नसल्याने त्यांच्यासाठी विकासाच्या योजना राबविण्यास अडचणी निर्माण होत आहे.  ह्या अडचणी दुर होण्यासाठी व राज्यातील तृतीयपंथी यांच्या विकासाकरिता धोरण निश्चित करण्यासाठी तृतीयपंथी यांची नोंदणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यात विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तृतीयपंथीय व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या समाजातील सर्व घटकांनी यासाठी सहकार्य करावे,

डॉ. प्रशांत नारनवने , आयुक्त समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे

          खालील कालावधीत राज्यातील विभागांमध्ये जिल्हा निहाय विशेष शिबीर 

आयोजन करण्यात आले आहे.

          मुंबई व पुणे विभाग दिनांक 23 मे, 2022 ते 31 जून, 2022,

नाशिक विभाग दिनांक 30 मे 2022 ते 3 जून, 2022

औरंगाबाद व लातुर विभाग दिनांक 1 जून ते 6 जून, 2022

नागरपूर व अमरावती विभाग दिनांक 1 जून ते 14 जून, 2022

           दिनांक 1 जून, 2022 वार बुधवार रोजी सकाळी  10.00 वाजता सामाजिक न्याय भवन, जळगाव येथे विशेष एकदिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना केंद्र शासनाच्या (https://transgender.dosje.gov.in)  या वेबसाईटवर तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे तृतीयपंथी व्यक्तीचे आधार कार्ड, मतदान कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, नावात बदल केला असेल तर शासनाचे गॅझेट व एफीडेव्हीड सादर करुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी आपली नोंदणी करावी, तसेच अडचणी आल्यास सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिर समोर महाबळ रोड, जळगाव            (0257-2263328-29)  येथे संपर्क करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण जळगाव योगेश पाटील यांच्या वतीने करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सहकार विभागांतर्गत जी.डी.सी.अँड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा  दिनांक 27 ,28 व 29 मे, 2022 रोजी

Next Post

समाजाने काय दिले यापेक्षा आपण समाजाला काय देऊ शकतो याचा विचार स्नातकांनी करावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Next Post
समाजाने काय दिले यापेक्षा आपण समाजाला काय देऊ शकतो याचा विचार स्नातकांनी करावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

समाजाने काय दिले यापेक्षा आपण समाजाला काय देऊ शकतो याचा विचार स्नातकांनी करावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo