Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रेल्वे सवलत प्रक्रिया,दिव्यांग तपासणीसाठी कुपन सेवा दररोज;दिव्यांग मंडळाचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
रेल्वे सवलत प्रक्रिया,दिव्यांग तपासणीसाठी कुपन सेवा दररोज;दिव्यांग मंडळाचे आवाहन

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दर बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतच्या कार्यवाहीसाठी दिव्यांग बांधवांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी तारखेचे कुपन आगाऊ देण्यात येत असते. ज्या बांधवांना कुपन आवश्यक आहे, त्यांनी शासकीय कामकाजाच्या कोणत्याही दिवशी कार्यालयीन वेळेत कुपन घेण्यासाठी यावं असे आवाहन रुग्णालयाच्या दिव्यांग बोर्डातर्फे करण्यात आले आहे.

रुग्णालयात कोरोनाविरहित आजारांवर उपचार सुरु झाले आहे. त्यासोबत दिव्यांग बांधवांच्या वैद्यकीय तपासणी दर बुधवारी सकाळी ९ वाजता सुरु होते. दिव्यांग बांधवांची गैरसोय थांबावी याकरिता आगाऊ बुकिंग कुपन प्रणाली सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार हे कुपन शासकीय कामकाजाच्या कोणत्याही दिवशी मिळत असून कार्यालयीन वेळेतच घ्यायला यावे असे आवाहन करण्यात आला आहे.

तसेच, अनेक दिव्यांग बांधवाना रेल्वे सवलत प्रक्रिया करावयाची असते. त्याकरिता अनेक जण फक्त बुधवारीच येतात, असे निदर्शनास आले आहे. मात्र हि प्रक्रिया देखील सरकारी कामकाजाच्या कोणत्याही दिवशी केली जात आहे. त्याचाही दिव्यांग बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रमाणपत्र मिळण्याबाबतची प्रक्रिया
दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी शासकीय संकेतस्थळ (www.swavlambancard.in) येथे जाऊन (Apply for Disability certificate & UDID card) या लिंकवर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. तेथे प्रमाणपत्र नूतनीकरणची देखील लिंक उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून दिव्यांग मंडळातून कोणत्याही शासकीय कामकाजाच्या दिवशी जाऊन बुकिंग कुपन घ्यावे. कूपनवर दिलेल्या तारखेला अर्जासह आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट २ फोटो व जुने दिव्यांग प्रमाणपत्र तथा संबंधित उपचाराची कागदपत्र घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लाभार्थ्यांनी सकाळी ९ वाजता वेळेवर उपस्थित राहावे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दुर्मिळ “गुलेंन बारे सिंड्रोम” च्या रुग्णावर यशस्वी उपचार

Next Post

नेहरू युवा केंद्र व प्रवर्तन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर भारत विषयी जागरूकता अभियान उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo