Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निसर्गाच्या जवळ जाऊन शाश्वत शेतीची कास धरा;जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे प्रतिपादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
निसर्गाच्या जवळ जाऊन शाश्वत शेतीची कास धरा;जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे प्रतिपादन

जळगाव, दि.1 (जिमाका वृत्तसेवा) :-  बदलते निसर्गचक्र ओळखून निसर्गाच्या जवळ जात शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्‍यांनी पुढाकार घ्यायला हवा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

 जिल्हा परिषदेच्या सानेगुरुजी सभागृहात वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित  कृषी दिनाच्या  कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबूलाल पाटील,     कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे आदी. अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे या वेळी पूजन करण्यात आले.

  या वेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की , दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे मोठे योगदान होते .शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यासाठी उपयुक्त आहेत या योजनांचा लाभ घेऊन शेती समृद्ध करणे गरजेचे आहे. शेती सोबतच कृषी उद्योजकता वाढीस लागणे गरजेचे आहे. त्या सोबतच प्रक्रिया उद्योगावर शेतकऱयांनी भर दिला पाहोजे. पारंपारिक तंत्रद्यानात बदल करून यांत्रिकीकरणाचा साहाय्याने शेतीला अधिक विकसित करणे महत्वाचे आहे. असेही ते म्हणाले.

रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळणे महत्वाचे आहे. शासनाच्या योजनांचा शेतकऱयांनी अधिकाधिक फायदा घेऊन आपली शेती विकसित करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले .जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी आपल्या मनोगतात सांगितले की , शेतकऱयांनी आपल्या पिकपद्धतीत बदल करून बहुविध पीकपद्धती घेणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीकडे वळून शेती विकसित करणे महत्वाचे आहे .हे सांगतानाच त्यांनी शेतकऱयांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शेती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱयांचा जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यात देवेंद्र माळी, बळीराम वराडे, राहुल पाटील, संभाजी पाटील, यांचा समावेश होता. शेतकऱयांनी शेतात फवारणी करताना काळजी घ्यावी, यासाठी फवारणी किट चे वितारण देखील शेतकऱयांना करण्यात आले. सोबतच नॅनो युरिया पॅक चे वितरण देखील करण्यात आले. कापूस संगोपन व लागवड या विषयावर शास्त्रज्ञ संजीव पाटील यांनी मार्गदर्शन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2021-22 मधील नुकसान भरपाई वाटप अंतिम टप्प्यात

Next Post

आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील यंत्रणांना निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo