Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा रोटरी क्लबचे उपक्रम प्रशंसनीय : प्रांतपाल रो. रमेश मेहेर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
पाचोरा रोटरी क्लबचे उपक्रम प्रशंसनीय : प्रांतपाल रो. रमेश मेहेर

पाचोरा – येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव चे सर्व उपक्रम समाजाभिमुख तसेच रोटरी च्या ध्येय धोरणांना अनुकूल असून कोविड नंतरच्या सामान्य परिस्थितीत येथील रोटरी क्लबने घेतलेले सर्वच उपक्रम अत्यंत प्रशंसनीय असल्याचे मत प्रांतपाल रो. रमेश मेहेर यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ पाचोरा -भडगाव ला प्रांतपाल रो. रमेश मेहेर यांनी नुकतीच भेट दिली. यावेळेस त्यांच्यासमवेत उपप्रांतपाल रो. गोविंद मंत्री व उपप्रांतपाल रो. राजेश बाबूजी मोर उपस्थित होते.

रोटरी प्रांतपाल भेटीच्या निमित्ताने दिनांक 13 मार्च 2022 रोजी निर्मल रेसिडेन्सी च्या कॉन्फरन्स हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव चे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण पाटील व सेक्रेटरी प्रा. डॉ. पंकज शिंदे यांनी प्रांतपाल रमेश मेहेर, उपप्रांतपाल गोविंद मंत्री, उपप्रांतपाल राजेश मोर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

स्थानिक अध्यक्ष डॉ.बाळकृष्ण पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात स्थानिक क्लब विषयी माहिती दिली. तर सेक्रेटरी डॉ पंकज शिंदे यांनी स्थानिक क्लबच्या अर्धवार्षिक उपक्रमांचा आढावा मान्यवरांच्या समोर सादर केला.

उपप्रांतपाल गोविंद मंत्री यांनी प्रांतपाल रमेश मेहेर यांच्या सार्वजनिक जीवन कार्याचा परिचय करून दिला. प्रांतपाल रमेश मेहेर यांनी पाचोरा रोटरी क्लबच्या उपक्रमांचे मुक्तकंठाने कौतुक केले. तसेच रोटरीचा वैश्विक निधी उभारणीसाठी आवश्यक असलेल्या योजना व उपक्रम यांची माहिती सांगितली. सुमारे पाऊण तासांच्या मनोगतात प्रांतपाल रमेश मेहर यांनी रोटरी उत्सव ,प्रदूषण मुक्तीसाठी घेण्यात येणारे उपक्रम, समाजाभिमुख उपक्रम, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांसाठी उपयुक्त असलेले दिशादर्शक उपक्रम या बाबत चर्चा केली.

याप्रसंगी पाचोरा रोटरी क्लब च्या प्राउड डोनर (Proud Doner)सदस्यांचा गौरव प्रांतपाल यांच्या हस्ते पिन लावून करण्यात आला त्यात प्रामुख्याने रो. प्रदीप पाटील, रो.डॉ.बाळकृष्ण पाटील, रो. डॉ. अमोल जाधव, रो. निलेश कोटेचा, रो. रुपेश शिंदे, रो. भरतकाका सिनकर, रो.डॉ.पंकज शिंदे, रो.डॉ. मुकेश तेली, रो. सुयोग जैन इत्यादी मेजर डोनर सदस्यांनी रोटरी इंटरनॅशनलला प्रत्येकी शंभर डॉलर्स चा निधी दिल्याबद्दल व पाचोरा क्लबचे सदस्य उपप्रांतपाल रो. राजेश बाबूजी मोर यांनी तीन हजार डॉलर चा निधी दिल्याबद्दल प्रांतपाल रो.रमेश मेहेर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला रोटरी सदस्य चंद्रकांत लोढाया रो. डॉ. मुकेश तेली, रो.डॉ. प्रशांत सांगळे, रो. डॉ. पवन पाटील, रो. डॉ. गोरख महाजन, रो.रावसाहेब बोरसे, रो. डॉ. भूषण मगर, रो. शैलेश खंडेलवाल, रो. शिवाजी शिंदे, रो. नीरज मुनोत, आदी रोटरी सदस्य उपस्थित होते. रो.सुयोग जैन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले कार्यक्रमानंतर रोटरीच्या निवडक उपक्रमांना प्रांतपाल रो. रमेश मेहर व मान्यवरांनी भेटी दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

देशमुख महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबीर संपन्न

Next Post

अखिल भारतीय युवक महासंघ संघटनेचे शेलवड येथे शाखा उद्घाटन

Next Post
अखिल भारतीय युवक महासंघ संघटनेचे शेलवड येथे शाखा उद्घाटन

अखिल भारतीय युवक महासंघ संघटनेचे शेलवड येथे शाखा उद्घाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d