Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पीएच.डी ची PET परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत जिल्हाधिकारी व प्रकुलगुरू यांना “मासु” च्या वतीने निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/01/2022
in जळगाव, राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
पीएच.डी ची PET परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत जिल्हाधिकारी व प्रकुलगुरू यांना “मासु” च्या वतीने निवेदन
जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देतांना संघटनेचे सहसचिव दिपक सपकाळे

जळगाव – (प्रतिनिधी) – येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अतंर्गत पीएच.डी ची PET परीक्षा ही परीक्षा केंद्रावर घेण्यात येत असते. 2021-22 च्या पीएच.डी पूर्व परीक्षा PET ही परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या पदाधिकारी यांना कळताच जळगाव येथील संघटनेचे पदाधिकारी दिपक सपकाळे व संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रकुलगुरू यांची भेट घेत निवेदन दिले.

प्रकुलगुरू महोदयांना निवेदन देताच प्रकुलगुरू यांनी यावर सांगितले की, ही पीएचडी ची PET परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरच यावे लागेल.

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन च्या वतीने जिल्हाधिकारी यांना देखील दिले निवेदन

पीएचडी ची PET परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांना देखील महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन च्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात देखील पीएच.डी PET परिक्षा ही परिक्षा केंद्रावर न घेता विद्यार्थी असेल त्या ठिकाणावरुन परिक्षा घेण्यात यावी या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

महाराष्ट्र मधील कोरोनाची स्थिती सर्वांना न्ह्यातच आहे. त्यात ओमिक्रॉन हा ही नवा व्हेरियंट ने थैमान घातले असून आपल्या येथील पीएच.डी PET च्या परीक्षेसाठी महाराष्ट्रभरातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर येत असतात. जिल्ह्यात आधिच कोविड 19 आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे, दररोज ४०० च्या वर आकडे समोर येत आहे. बस सेवा देखील बंद आहे. हा ही खूप मोठा प्रश्न विद्यार्थ्यांन समोर आहे.

परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती होऊन कोविड-१९ चा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कोविड-१९ चा फैलाव झाल्यास जबाबदार कोण?

सदर पीएच.डी PET परिक्षा ही ऑनलाइन पद्धतीनेच विद्यार्थी असेल तिथुन परिक्षा घ्यावी या आशयाचे निवेदन महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन चे सहसचिव दिपक सपकाळे व जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांनी जिल्हाधिकारी व प्रकुलगुरू यांना दिले आहे. यावर काय निर्णय होणार याकडे मात्र सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागुन आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी भडगांव महिला दक्षता समितीचे आमदारांना निवेदन

Next Post

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिन समारंभ – ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ ९.१५ वाजता

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo