Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/05/2026
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

जळगाव – (प्रतिनिधी) – पद्मालय गणपती मंदिर येथे अंगारकी चतुर्थीच्या पावन निमित्ताने पहाटेच्या मंगलमय वातावरणात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक, विधिवत पूजा व आरती संपन्न झाली. पहाटे ४ वाजता पार पडलेल्या या पूजेमुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.

पद्मालय हे गणपतीचे अत्यंत प्राचीन व जागृत स्थान मानले जाते. विशेष म्हणजे डाव्या व उजव्या सोंडेचे गणपती एकाच ठिकाणी विराजमान असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे. संकष्टी, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पद्मालय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करुन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज पहाटे विधिवत पूजा व आरती केली. व त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी मंदिराचे पुजारी गणेश वैद्य व केशवराव पुराणिक यांनी विधीपूर्वक पूजा सांगितली. पूजा संपल्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मंदिराचा इतिहास तसेच सुरू असलेल्या विकास कामांची माहिती घेतली. श्री गणपती मंदिर देवस्थान पद्मालय ट्रस्टतर्फे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा शाल व गणरायाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विश्वस्त आनंदराव पाटील, भिका पाटील, गोकुळ देशमुख, डॉ. पांडुरंग पिंगळे, राजेश तिवारी, अर्जुन पाटील, शिरीष बर्वे यांच्यासह तहसीलदार गोपाल पाटील, जैन इरिगेशनचे अनिल जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते. देवस्थानचे सहकारी अशोक पाटील व जोशी यांनी पूजेचे नियोजन केले. संकष्टी, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पद्मालय येथे होणारा हा धार्मिक सोहळा भाविकांसाठी श्रद्धेचा असतो. उन्हाची तिव्रता लक्षात घेता भाविकांसाठी पद्मालय देवस्थान तर्फे सावलीसाठी मंडपाची तसेच कुलर व थंड पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात येते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा!;प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

Next Post

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

Next Post
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo