Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना आंबिया बहार 2021-22

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 16- जिल्हयातील पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना – आंबिया बहार सन 2021-22 करीता अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित फळपिकांना लागु करण्यात आली असुन अंमलबजावणी सुरु आहे. सदर योजना ॲग्रीकल्चर इंन्सुरंन्स कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. जिल्हयात या आठवडयात वेगाचे वारे/ वादळामुळे फळपिकाचे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या नुकसानीची माहिती 72 तासात संबधीत कंपनीला कळविणे आवश्यक असते. या अनुषंगाने जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती कंपनीला तात्काळ कळविणे पंचनामे करुन घ्यावेत  असे आवाहन पालकमंत्री ना. श्री. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

          या संदर्भात माहिती अशी की माहे मे व जुन, 2022 मध्ये झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. विशेष करुन केळी पिकाचे नुकसान झाले आहे. यावेळी पालकमंत्री महोदय यांनी नुकसानीची पहाणी करुन पंचनामे करण्याचे निर्देश विमा कंपनी, महसुल व कृषि विभाग यांचे मदतीने वैयक्तिक पातळीवर करण्याचे आदेशीत केले.

          तसेच दिनांक 8 व 9 जून, 2022 रोजी झालेल्या केळी पिकाच्या नुकसानीची सुचना काही तांत्रिक कारणामुळे शेतकरी देवू शकले नाहीत. अशा शेतकऱ्यांनी दिनांक 15 जून, 2022 पर्यंत विमा कंपनीच्या तालुका कार्यालयात जावून नुकसानीचे सुचना क्रॉप इन्शुरन्स ॲपव्दारे करुन घेण्यात यावी. ज्या शेतकऱ्यांचे फळपिकांचे दोनदा नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांचे दुसऱ्या नुकसानीची सुचना क्रॉप इन्सुरन्स ॲपव्दारे नोंद होत नसल्याने, त्यांनी विमा कंपनीच्या तालुका कार्यालयात नुकसानीची ऑफलाईनव्दारे प्रपत्र-2 मध्ये माहिती भरुन सूचना दयावी.

          फळपिकाचे नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम गावपातळीवर विमा कंपनीमार्फत सुरु असुन शेतकऱ्यांनी मोबाईल चालू ठेवावा. तसेच शेतकऱ्यांनीपंचनामे पूर्ण करण्यासाठी विमा कंपनीला सहकार्य करावे. त्याचबरोबर विमा कंपनीला पुर्व सुचना केल्याच्या 5 दिवसात विमा कंपनीमार्फत होणारे पंचनामे पुर्ण करावेत सदर नुकसानीचे पंचनामे योजनेच्या कार्यपध्दतीनुसार करण्यात येत असल्याने त्यासाठभ्‍ शेतकऱ्यांकडुन कोणतेही शुल्क आकरले जात नाही. त्यामुळे कोणी पैसे मागत  असल्यास देवू नये. नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणाऱ्या नुकसानी पासुन बचाव करणेसाठी शेतकरी बांधवांनी बांधावर वारारोधक म्हणून अनुदानीत बांबु पिकाची लागवड करावी असे आवाहन पालकमंत्री महोदय यांनी केली

          या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी डॉ. पंकज आशिया, मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा तक्रार निवारण सदस्य हितेश आगीवाल, विमा कंपनी प्रतिनिधी अतुल झंकार, नितीन कुमार, कुंदन बारी, शेतकरी दगडु चौधरी डॉ. सत्वशिल जाधव व किरण पाटील यादी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्याकरीता आपली पेंशन आपल्या दारी

Next Post

प्रतिबंधीत अन्न पदार्थावर करावाई

Next Post
प्रतिबंधीत अन्न पदार्थावर करावाई

प्रतिबंधीत अन्न पदार्थावर करावाई

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo