Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“फेम” आयोजित स्पर्धेत पालवी जैनच्या ” स्वदेशी खरेदी करा” आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/10/2025
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
“फेम” आयोजित स्पर्धेत पालवी जैनच्या ” स्वदेशी खरेदी करा” आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!

“फेम” आयोजित स्पर्धेत पालवी जैनच्या ” स्वदेशी खरेदी करा” आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!

जळगाव – (प्रतिनिधी) – देशाला विश्वस्तरावर अग्रस्थानावर नेण्यासाठी सरकारस्तरावर होणाऱ्या विविध योजनांपैकी एक असणाऱ्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देऊन देशातल्या व्यावसायिकांना मुख्य धारेत आणून राष्ट्राला मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त फेम ( फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग इंटरप्रीनर्स) आयोजित आर्टवर्क स्पर्धेत ” स्वदेशी खरेदी करा” आवाहन करणारे आर्टवर्क महाराष्ट्रभरातून जाहिरात संस्था, कला महाविद्यालय आणि व्यावसायिक कलाकारांकडून मागवण्यात आले होते. या स्पर्धेत जळगावच्या पालवी जैन हिच्या कलाकृतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. तिच्या आर्टवर्कमधे परदेशी “प्रादा” पादत्रांणासोबत आपल्या कोल्हापुरी चप्पल अभिमानाने मिरवत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी प्रादा या ब्रँड ने कोल्हापुरी चपलेचे डिझाईन कॉपी केल्याने एक वाद सोशल मीडियावर खूप ट्रेंड झाला होता, या वादाच्या पार्श्र्वभूमीचा धागा पकडत पालवीने हे आर्टवर्क सादर केले होते. अकरा हजार रुपये आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री अशोक जैन, चित्रकार विकास मल्हारा, परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील तसेच राज्यातील कला आणि जाहिरात क्षेत्रातील तसेच जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पालवीचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे. पालवी जैन नीलिमा जैन आणि जैन इरिगेशनचे कला विभागाचे श्री विजय जैन यांची मुलगी आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत पालवीचे वडील श्री. विजय जैन यांनी सुध्दा सहभाग घेतला होता.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाडवा पहाट कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त दाद

Next Post

स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी

Next Post
स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी

स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo