Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बहिणी येती घरा तोची दिवाळी दसरा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
06/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
बहिणी येती घरा तोची दिवाळी दसरा

जळगाव(प्रतिनिधी)- त्या दोघी सख्ख्या बहिणींची गोष्ट… गेल्या तीस वर्षात चार ते पाच वेळा फक्त धावती भेट…एकमेकांचे घरही व्यवस्थित माहिती नाही.. एकमेकांच्या कधी घरी राहिले नाही…संपर्क नाही… अखेर दीड वर्षापूर्वीच सातत्याने फोनद्वारे संपर्कात आले आणि बहिणींचा प्रत्यक्ष भेटीचा योग अखेर भाऊबीजेच्या पावन दिवशी जुळून आला. त्या दोघींनी खऱ्या अर्थाने ‘बहिणबीज’ साजरी केली… लहान बहीण मोठ्या बहिणीच्या घरी आली अर्थातच मोठ्या बहिणीला इतका आनंद झाला की तिने रांगोळ्या काढून, फुलांच्या पाकळ्यांनी अंगण सजवले. बहिणीच्या कुटुंबाचे औक्षण करीत तिचे अनोख्या पद्धतीने स्वागत करीत तिला सरप्राईज दिले.

जळगाव शहरात एम.जे.कॉलेज मागे लक्ष्मीनगर येथे मीनाक्षी विश्वजीत चौधरी हे पती व मुलीसह राहतात. त्यांचे माहेर सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज गावामधील आहे. त्यांची आईची व त्यांची त्यांचे वय दीड वर्षाचे असतानाच कौटुंबिक कलहामुळे ताटातूट झाली होती. त्यामुळे मिनाक्षी यांची सख्खी बहीण दिपाली अमित कांबळे यांच्याशी त्यांची भेटच नव्हती.

मीनाक्षी चौधरी यांना त्यांचे आजी, आजोबा व वडिलांनी तसेच ज्येष्ठ आत्या यांनी सांभाळ केला. शिक्षणानिमित्त मीनाक्षी चौधरी या जयसिंगपूर, हातकणंगले, कोल्हापूर शहर येथे राहिल्या. दरम्यान, त्यांच्या बहिणीशी उभ्या आयुष्यामध्ये चार ते पाच वेळा भेटी झाल्या, मात्र या सर्व भेटी केवळ काही मिनिटांच्या ठरल्या. एकमेकांच्या घरी जाणे, भेटणे, काही दिवस राहणे असे कधीही झाले नाही. दीड वर्षापूर्वी मीनाक्षी व दिपाली यांचे आजोबा अमृता गणू कांबळे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या उत्तर क्रियेच्या कार्यक्रमानिमित्त कसबे डिग्रज गावात मीनाक्षी चौधरी यांना त्यांची आई आणि बहीण दिपाली यांची भेट झाली.

भेटीमध्ये त्यांच्याबरोबर गप्पा झाल्या. यानंतर मग दूरध्वनीवरून सातत्याने दोन्ही बहिणी संपर्कात आल्या. त्यातूनच आमच्याकडे काही दिवस राहायला या म्हणून मीनाक्षी चौधरी यांनी बहिणीला गळ घातली होती. त्यानुसार दीपाली कांबळे त्यांचे पती अमित कांबळे, तिन्ही मुले यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कोंडिग्रे येथून भाऊबीज निमित्त जळगाव शहरात आले आहे. जळगाव मध्ये पहिल्यांदाच ते आले आहे.

धाकटी बहीण दीपाली कांबळे त्यांच्या कुटुंबासह सकाळी येताच बहिण मिनाक्षी यांना इतका आनंद झाला की, तिने रांगोळ्या काढून त्यावर फुलांची सजावट करीत अंगण सजविले. तसेच त्यांचे औक्षण करून फुलांच्या पाकळ्या टाकत त्यांचे शाही स्वागत केले. यामुळे बहिण दिपाली आणि त्याचे कुटुंब स्वागताने भारावून गेले. तसेच दोघा बहिणींनी बहीण बीज देखील आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली.

Team Satymev Jayate

Previous Post

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

Next Post

नगरसेविका योजना पाटील यांनी शेतमजूर बंधूना औक्षण करत साजरी केली भाऊबीज

Next Post
नगरसेविका योजना पाटील यांनी शेतमजूर बंधूना औक्षण करत साजरी केली भाऊबीज

नगरसेविका योजना पाटील यांनी शेतमजूर बंधूना औक्षण करत साजरी केली भाऊबीज

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo