Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बालमृत्यू नियंत्रणासाठी जलसंजीवनी आवश्यक – डॉ. बेंडाळे

जागतिक ओआरएस दिनानिमीत्त सप्ताहाचे आयोजन उत्साहात

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
बालमृत्यू नियंत्रणासाठी जलसंजीवनी आवश्यक – डॉ. बेंडाळे

जळगाव – बालमृत्यू होण्याची साधारणपणे पाच कारणे आहेत. त्यातील अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे डिहायड्रेशन अर्थात अतिसार. अतिसारामुळे बालके दगावण्याचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण नियंत्रणात आणायचे असेल तर ओआरएस म्हणजेच जलसंजीवनीचा वापर अधिक करणे आवश्यक असल्याचे मत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे यांनी व्यक्त केले.

 

जागतिक ओआरएस दिनानिमीत्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाच्या बालरोग विभागातर्फे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलतांना डॉ. बेंडाळे म्हणाले की, लहान मुलांना अतिसार होणे, अति ताप येणे यामुळे सर्वाधिक बालमृत्यू होतात. शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर, लघवी कमी होणे, अश्रु कमी होणे, जीभ कोरडी पडणे, त्वचेला चिमटी घेतल्यास ती त्वरीत पुर्ववत न होणे अशी अतिसाराची लक्षणे आहेत. ही लक्षणे गंभीर असल्याने त्यावर उपचार करणे आवश्यक असते. ओआरएस अर्थात जलसंजीवनी हे साखर, मीठ व पाणी हे प्रमाणात टप्प्याटप्प्याने घेतल्यास अतिसार कमी होतो.

 

जागतिक आरोग्य संघटनेने देखिल ओआरएस वापरासंबंधी मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. त्यानुसार ओआरएसचा अधिकाधिक वापर केल्यास अतिसाराची समस्या दूर होते. तसेच बालकाची रोगप्रतिकारक शक्ती देखिल वाढण्यास मदत होते. जागतिक ओआरएस दिन साजरा करतांना ओआरएसचे महत्व जाणून घेऊन त्याचा वापर केल्यास बालमृत्यू सहज कमी होतील असा विश्‍वास डॉ. अनंत बेंडाळे यांनी व्यक्त केला. बालरोग तज्ञ डॉ. रोहीणी देशमुख यांनी आभार मानले.
ओआरएसमुळे 50 टक्के आजार आटोक्यात- डॉ. अणेकर
बालरोग तज्ञ डॉ. अणेकर यांनी मार्गदर्शन करतांना ओआरएसचे महत्व पटवून सांगितले. ओआरएसच्या वापरामुळे लहान मुलांमधील 50 टक्के आजार आटोक्यात आणता येतात. तसेच बालकाला कुठल्याही सलाईनची गरज पडत नाही. आपल्या देशात दुर्गम भागात याबाबत जनजागृती अधिक गरजेची असल्याचे हॉ. अणेकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी केले ओआरएसबाबत सादरीकरण
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील आदित्य महाजन, ऋषीकेश मडके, आदित्य काळे, महिमा गुल्हाणे, गुंजन जैन या विद्यार्थ्यांनी ओआरएसचे महत्व आणि वापरासंबंधीचे प्रात्याक्षिक कार्यक्रमात सादर केले. यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला डॉ. सुयोग तन्नीरवार, डॉ. उमाकांत अणेकर, डॉ. रोहिणी देशमुख, डॉ. दर्शन राठी, डॉ. कुशल धांडे, डॉ. चंदाराणी देगूलरकर, डॉ. ओमश्री गुडे, भारती झोपे यांच्यासह विद्यार्थी व माता उपस्थित होत्या.

Team Satymev Jayate

Previous Post

योगासना स्पर्धेत अनुभूती स्कूलच्या विवेक सूर्यवंशी याला सिल्वर मॅडेल

Next Post

श्रीराम विद्यालयात विद्यार्थ्यांना २ हजार वह्यांचे वाटप

Next Post
श्रीराम विद्यालयात विद्यार्थ्यांना २ हजार वह्यांचे वाटप

श्रीराम विद्यालयात विद्यार्थ्यांना २ हजार वह्यांचे वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo