Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाजप ‘ॲक्शन मोड’मध्ये! आगामी मनपा निवडणुकीची धुरा आमदार राजूमामा भोळे यांच्या खांद्यावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/12/2025
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
भाजप ‘ॲक्शन मोड’मध्ये! आगामी मनपा निवडणुकीची धुरा आमदार राजूमामा भोळे यांच्या खांद्यावर

भाजप ‘ॲक्शन मोड’मध्ये! आगामी मनपा निवडणुकीची धुरा आमदार राजूमामा भोळे यांच्या खांद्यावर

जळगाव-(प्रतिनिधी) – जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मोठी घोषणा केली आहे. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांची जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे ‘निवडणूक प्रमुख’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्र जारी करत ही महत्त्वाची जबाबदारी आ. भोळे यांच्या खांद्यावर दिली आहे. जळगाव शहरात आधी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे आमदार राजूमामा भोळे यांचा ‘करिश्मा’ निर्विवादपणे सिद्ध झाला आहे. लागोपाठ मिळालेल्या या यशामुळे आणि त्यांच्या प्रभावी संघटन कौशल्यामुळेच आता आगामी महापालिका निवडणुकीतही ‘मामां’च्या नेतृत्वावर पक्षाने मोठा विश्वास दाखवला आहे. विजयाची ही परंपरा कायम राखण्यासाठी पक्षाने त्यांच्याकडे ही धुरा सोपवली असल्याचे मानले जात आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत जळगाव महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आमदार राजूमामा भोळे यांच्या संघटन कौशल्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे.

सर्वांना सोबत घेऊन, अथक परिश्रम करून पक्षातर्फे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी आता निवडणूक प्रमुख म्हणून आ. भोळे यांच्यावर असणार आहे. या नियुक्तीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post

लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार; जैन हिल्स येथे ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५चा समारोप

Next Post
लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार; जैन हिल्स येथे ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५चा समारोप

लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी - डॉ. एन. के. कृष्णकुमार; जैन हिल्स येथे 'राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५चा समारोप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo