Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
25/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना

मुंबई(प्रतिनिधी)- भूमि अभिलेख विभागातील गट ‘क’ संवर्गातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. महसूल व वन विभागामार्फत याबाबतचा शासन आदेश 25 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावर उपसंचालक भूमि अभिलेख, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर प्रदेशातील गट ‘क’ संवर्गातील पदे भरण्यासाठी निवड समिती गठित करण्यात आली आहे.

या समितीमध्ये जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक हे अध्यक्ष असतील. तसेच ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत तेथे अन्य विभागाचे उपसंचालक भूमि अभिलेख, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय समाजकल्याण अधिकारी, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय सैनिक कल्याण अधिकारी हे सर्व या समितीमध्ये सदस्य असतील. तर ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख संलग्न उपसंचालक भूमि अभिलेख हे सदस्य सचिव या समितीमध्ये असतील.

जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांच्या अनुपस्थितीत निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अप्पर जमाबंदी आणि भूमि अभिलेखचे अतिरिक्त संचालक कामकाज पाहतील. निवड समितीमध्ये आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त सदस्यांची निवड करण्याची मुभा जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांना राहील. ज्या विभागात पदे भरण्यात येणार आहेत त्या विभागात निवड समितीचे सदस्य म्हणून अन्य विभागातील भूमि अभिलेख उपसंचालक यांची नियुक्ती जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांच्या स्तरावरुन करण्यात येईल. असे शासन आदेशात नमूद आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

जातीव्यवस्थेचे उच्चाटन होणे ही राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत गरजेची बाब -राज्यपाल

Next Post

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची ‘सफल’ प्रक्रिया केंद्राला अभ्यास भेट

Next Post
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची ‘सफल’ प्रक्रिया केंद्राला अभ्यास भेट

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची ‘सफल’ प्रक्रिया केंद्राला अभ्यास भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo