Thursday, April 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची ‘सफल’ प्रक्रिया केंद्राला अभ्यास भेट

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
25/10/2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची ‘सफल’ प्रक्रिया केंद्राला अभ्यास भेट

नवी दिल्ली(प्रतिनिधी)- राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांचा शेतमाल आणि वनउपज प्रत्यक्ष रिटेल चेनद्वारे अंतिम वापरकर्त्याला विकण्याच्या उद्देशाने अभ्यास करण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष श्री नरहरी झिरवाळ यांनी आज दिल्ली स्थित ‘मदर डेयरी’ च्या सफल या फळ व भाजीपाला प्रक्रिया केंद्राला भेट दिली.

श्री. झिरवाळ यांनी येथील मंगोलपुरी औद्योगिकक्षेत्रात स्थित सफल फळ व भाजीपाला प्रक्रिया केंद्राला भेट दिली. राज्यातील आदिवासी शेतकरी विविध प्रकारची फळे व भाजीपाला यांचे उत्पादन घेतात. या शेतकऱ्यांच्या मालाला उचित दर व बाजारपेठ मिळावी तसेच गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादनासाठी त्यांनी मदर डेयरीचे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ.ओमविर सिंह यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. सफलकडून शेतकऱ्यांना करण्यात येणारे मार्गदर्शन आदिंविषयांचीही माहिती घेतली.

नाचणीपासून ते स्ट्रॉबेरी, द्राक्षे आदि वैविद्यपूर्ण पीक घेणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांचा माल रिटेल चेनद्वारे उपभोक्त्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सफलकडून भविष्यात सहकार्य मिळण्याची अपेक्षाही श्री झिरवाळ यांनी यावेळी व्यक्त केली.श्री. झिरवाळ यांनी येथील २२ एकर परिसरात वसलेल्या सफल केंद्राची पाहणी केली. त्यांनी या केंद्रातील मध्यवर्ती वितरण सुविधा (सीडीएफ) समजून घेतली. येथील वाटाणा प्रक्रिया विभाग, वाटाणा पॅकेजिंग विभाग, शीतगृह, फळ पिकवणी विभाग, डिस्पॅच विभाग तसेच या केंद्राच्या परिसरातील सफल आऊटलेटलाही भेट दिली व याबाबतची यंत्रणा सविस्तररित्या जाणून घेतली.

डॉ.ओमविर सिंह यांनी यावेळी सादरीकरण केले. सफल केंद्राच्यावतीने शेतकऱ्यांच्या मालाला देण्यात येणारा उचित दर व ग्राहकांना रास्त दरात उपलब्ध करून देण्यात येणारा गुणवत्तापूर्ण माल आदिंबाबत सविस्तर माहिती दिली.मंगोलपुरी स्थित सफलचे बिजनेस हेड विनोद कुमार, युनिट हेड अशोक कुमार, फार्मर डेव्हलपमेंट विभाग प्रमुख डॉ विनीत कथुरिया यांच्यासह श्री झिरवाळ यांचे खाजगी सचिव मुकेश भोग, विशेष कार्य अधिकारी सर्वश्री राजू नंदकर आणि अजित कसरळीकर उपस्थित हेाते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना

Next Post

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ -परिवहनमंत्री

Next Post
डिझेलवर धावणाऱ्या १ हजार गाड्यांचे सीएनजीमध्ये करणार रुपांतर -परिवहन मंत्री ॲड.अनिल परब

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ -परिवहनमंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d