Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मल्हार हेल्प-फेअरची तय्यारी अंतिम टप्प्यात, जिल्ह्यासह बाहेरच्या अनेक सेवाभावी संस्थां झाल्यात सज्ज

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-  असं म्हणतात की,  “दान” करणारा “शूर” असतो, तर “मदत”करणारा “वीर” असतो. आणि जो जीवनात सदैव “सत्कर्म” करीत असतो. तोचं खरा “कर्मवीर”असतो. या गोष्टीचीच प्रेरणा घेऊन समाजातील गरजू,वंचित, उपेक्षित घटकांना मदत करणाऱ्या समाजभूषण संस्थांचं आणि सेवामहर्षींच्या गॅलरीचे प्रदर्शन ”हेल्प-फेअर ३” ची तय्यारी अंतिम टप्प्यात आली असून १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान हा सामाजिक उपक्रम शहरातील सागर पार्क येथे पार पडणार आहे.                    
लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन आणि मल्हार कम्युनिकेशन्स द्वारा आयोजित हेल्प-फेअर ३ मध्ये जळगाव जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पहावयास मिळत आहे. आतापर्यंत पन्नास पेक्षा अधिक संस्थांची आणि चाळीस सेवा महर्षींची हेल्प-फेअर ३ साठी नोंदणी झालेली असून हेल्प-फेअरच्या या प्लॅटफॉर्मद्वारे आपले सेवा कार्य जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि जास्तीतजास्त लोकांना याचा लाभ देण्यासाठी या संस्था सज्ज झाल्या आहेत.                                  हेल्प-फेअर ३ च्या तैयारीचा आढावा घेण्यासंदर्भाची बैठक नुकतीच मल्हार कम्युनिकेशन्स येथे पार पडली. यंदा हेल्प-फेअरचे हे तिसरे वर्ष असून दरवर्षी यामध्ये नवनवीन लोकोपयोगी गोष्टींचा समावेशकरण्यात येत आहे. यावर्षी जळगाव जिल्ह्यासह बाहेरील काही संस्था देखील यामध्ये आपला सहभाग नोंदवत आहे. ज्यांच्याकडे समाजोपयोगी एखादी नवीन संकल्पना आहे अश्या व्यक्ती वा संस्थेला स्टार्टअपसाठी या मध्ये नाव नोंदवता येणार आहे. यावर्षी हेल्प-फेअर ३ मध्ये काही महिला बचत गटांचे फूड स्टॉल देखील असणार आहे. त्यामुळे खवैय्या खान्देशकर हेल्प-फेअर पाहून झाल्यानंतर मनसोक्त मेजवानीचा आनंद लुटू शकतील. समाजाला चांगले आरोग्य आणि जीवन देण्यासाठी शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी जे दिवस-रात्र कार्यरत असतात अश्या काही स्वच्छतादूतांचा देखील सत्कार हेल्प-फेअर ३ मध्ये करण्यात येणार आहे. हेल्प-फेअर ३ मध्ये सहभागी होणाऱ्या जळगाव जिल्हा आणि बाहेरून येणाऱ्या विविध संस्थांच्या संस्था चालकांसाठी हेल्प-फेअर टीमतर्फे विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या समारोपीय मार्गदर्शनासाठी अनाथांची माय मा. डॉ. सिंधुताई सपकाळ यांची विशेष उपस्थिती असणार आहे.                     
मल्हार कम्युनिकेशन्स तर्फे नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून या प्रदर्शनीत तन मन धनाने मदत करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना आमंत्रित करण्यात येत आहे, जेणेकरून गरजूंना मदत करणाऱ्या कार्यसंस्थांचे कार्यक्षेत्र विस्तारून, व्यापक होऊन त्यांच्या कार्यास चालना, गती व उभारी मिळेल. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनीत हजारो व्यक्तींपर्यंत आपले सेवा कार्य पोहचविण्याची ही संधी असून त्याद्वारे मदत मिळविण्यास चालना मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त सेवाभावी संस्था, एनजीओज व व्यक्तींनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन मल्हार हेल्प-फेअर टीमकडून करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शासकीय योजनांच्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे गुरुवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते जळगावात उद्घाटन

Next Post

आम आदमी पार्टीच्या बहुमताचा विजय जळगाव जिल्ह्यात जल्लोष

Next Post

आम आदमी पार्टीच्या बहुमताचा विजय जळगाव जिल्ह्यात जल्लोष

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo