Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासकीय योजनांच्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे गुरुवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते जळगावात उद्घाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका) – जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावेत. याकरीता संपूर्ण जिल्ह्यात प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेच्या मेळाव्यांचे गुरुवार, दिनांक 13 फेब्रुवारी, 2020 पासून आयोजन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील पहिल्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.00 वाजता के. सी. ई. सोसायटीचे मैदान, ए. टी. झांबरे विद्यालयाजवळ करण्यात आले असून या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्यास प्रमुख पाहूणे म्हणून रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री उन्मेश पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. रंजनाताई पाटील, जळगाव महानगरपालिकेच्या महापौर सौ. भारतीताई सोनवणे, आमदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधि‍कारी तथा मुद्रा बॅक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात शासनाच्या ‍ विविध योजनांबाबत प्रबोधन करण्यात येणार असून प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेतंर्गत स्वयंरोजगारासाठी तसेच लघु उद्योगासाठी त्याचबरोबर आपला व्यवसाय वृध्दीगंत करण्यासाठी रुपये दहा हजारापासून ते दहा लाखांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध होणेबाबत विविध बँकांचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर या मेळाव्याच्या ठिकाणी शासनाच्या कृषि विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, समाजकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, कौशल्य विकास विभाग, महिला व बालविकास, विविध राष्ट्रीयकृत बँका तसेच शासनाचे अंगिकृत व्यवसाय असलेली विविध विकास महामंडळांचे माहितीचे स्टॉल लावण्यात येणार असून याठिकाणी बेरोजगार तरुण, स्वयंरोजगार करु ईच्छिणारे युवक व लघु उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

याचप्रकारचे मेळावे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात येणार असून त्याच्या तारखा व ठिकाण पुढीलप्रमाणे आहे. एरंडोल-17 फेब्रुवारी, डी. डी. एस. पी. महाविद्यालय, म्हसावद नाका. धरणगाव- 18 फेब्रुवारी, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय. पारोळा- 24 फेब्रुवारी, कृषी उत्पन्न बाजार समिती. अमळनेर- 25 फेब्रुवारी, साने गुरुजी विद्यालय, धुळेरोड. चोपडा- 27 फेब्रुवारी, पंकज महाविद्यालय, बोरोले नगर, यावल रोड, यावल- 28 फेब्रुवारी, धनाजी नाना महाविद्यालय. फैजपूर. रावेर- 29 फेब्रुवारी, विठ्ठलराव शंकरराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालय. मुक्ताईनगर- 2 मार्च, संत मुक्ताई कला व वाणिज्य महाविद्यालय. भुसावळ- 4 मार्च, बियाणी पब्लीक स्कुल, भिरुड हॉस्पिटलजवळ. बोदवड-6 मार्च, बोदवड एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय. जामनेर- 11 मार्च, एकलव्य माध्यमिक विद्यालय. पाचोरा- 12 मार्च, मानसिंगा मैदान, शिवाजी चौक, भडगाव- 13 मार्च, शेतकरी सहकारी संघ, पाचोरा रोङ. चाळीसगाव- 16 मार्च, 2020 रोजी राष्ट्रीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय याठिकाणी होणार असून सर्व मेळाव्यांची वेळ ही सकाळी 11 वाजता राहणार आहे.

या मेळाव्यांना जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण, स्वयंरोजगार करु ईच्छिणारे युवक व लघु उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाधि‍कारी तथा मुद्रा बॅक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एपिक छायाचित्रप्रदर्शन माझ्यासाठी कलेची मेजवानीच – अशोक जैन

Next Post

मल्हार हेल्प-फेअरची तय्यारी अंतिम टप्प्यात, जिल्ह्यासह बाहेरच्या अनेक सेवाभावी संस्थां झाल्यात सज्ज

Next Post

मल्हार हेल्प-फेअरची तय्यारी अंतिम टप्प्यात, जिल्ह्यासह बाहेरच्या अनेक सेवाभावी संस्थां झाल्यात सज्ज

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo