Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महात्मा गांधीजींची ती सायकल आता गांधीतीर्थमध्ये!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

महात्मा गांधीजींकडून मिळालेल्या सायकल सुभाष साळुंखे यांना देतांना कमला सहानी व त्यांची कन्या अमिया रुंगठा

सायकलीसमवेत गांधी तीर्थचे विश्वस्त अशोक जैन


जळगाव, दि. 14 (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी उत्तरप्रदेश मधील सिद्धार्थनगर तालुक्यातील जोगिया येथील स्वातंत्र्य सैनिक स्व. प्रभुदयाल विद्यार्थी यांना खुद्द महात्मा गांधीजींनी एक सायकल भेट दिलेली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जाज्वल्य आठवण व संदर्भ म्हणून जळगाव येथील गांधीतीर्थ बघणाऱ्या अभ्यागतांसाठी ही सायकल खूप मोलाची ठरेल यात शंका नाही.

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, आचार्य कृपलानी, खान अब्दूल गफ्फार खान यांच्या समवेत प्रभूदयाल विद्यार्थी.


स्वातंत्र्य सेनानी प्रभुदयालजी यांच्या पत्नी तथा माजी आमदार श्रीमती कमला साहनी आणि त्यांची मुलगी अमिया रूंगठा यांनी ही सायकल महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्या सांगण्यावरून सायकल गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रतिनिधी श्री. सुभाष साळुंखे यांच्याकडे दिली व आज सकाळी ती सायकल जळगाव येथे आणली गेली. महात्मा गांधीजींच्या परिस स्पर्शाने आठवणींचे सोने झालेली ही सायकल गांधी तीर्थमध्ये लवकरच संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.


असा आहे सायकलीचा इतिहास…
स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधीजींच्या वक्तृत्वाने अबालवृद्ध भारावले जात. त्यातील जोगिया उदयपूर निवासी स्वातंत्र्यता सेनानी स्व. प्रभूदयाल विद्यार्थी यांची स्वातंत्र्य आंदोलनात खूप मोलाची भूमिका होती. 1935 मध्ये ते केवळ 10 वर्षांचे असताना महात्मा गांधीजींचे शिष्य ठक्करबाप्पा यांच्यासोबत ते गांधीजींना सेवाग्राम येथे प्रथम भेटले. त्यावेळी महात्मा गांधींनी कस्तुरबा यांना प्रभुदयाल यांचा परिचय देताना म्हणाले होते की, हा तुझा सहावा मुलगा आहे. पुढील 14 वर्षे त्यांनी सेवाग्राम आश्रमात राहून महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यामधे सहभाग घेतला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रभूदयालजी यांना आपल्या गावी जावून जनसेवा करण्यासाठी गांधीजींनी प्रोत्साहीत केले. या कार्यात त्यांना सोयीस्कर व्हावे यासाठी त्यांनी जी सायकल भेट दिली, ती हीच सायकल आहे. महात्मा गांधींकडून भेट म्हणून मिळालेली ही सायकल सुरुवातीला सेवाग्राममधे वापरली गेली. नंतर ही सेवाग्रामहून प्रभुदयालजी विद्यार्थींसोबत त्यांच्या उत्तरप्रदेशातील जोगिया गावी आली.

तेथे स्वातंत्र्यानंतर जमिन कमाल मर्यादा कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना जमिन वितरण आणि तत्सम इतर सामाजिक व रचनात्मक कार्यासाठी हीचा त्यांनी वापर केला. त्यांच्या याच कार्यामुळे ते ‘पूर्वांचलचे गांधी’ म्हणून ओळखले जायचे. याच सायकलवर फिरून त्यांनी 5 वेळा तेथे आमदारही झाले. महात्मा गांधी आणि प्रभुदयाल विद्यार्थी यांची हीच विरासत असलेली सायकल स्वरुपात गांधी तीर्थ येथील संग्राहलयात संरक्षित करण्यात येणार आहे.
सायकल म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा स्मृतिसुगंध- अशोक जैन


महात्मा गांधीजींच्या स्मृतिंचा सुगंध असलेल्या या सायकलीचे गांधीतीर्थ येथील अस्तित्व सुयोग्य असेच ठरणार आहे. महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी या सायकलीबाबत सांगितले असता या सायकलीबाबत उत्कंठा लागलेली होती. स्वातंत्र्य सैनिक प्रभुदयालजी यांच्या परिवाराने ही सायकल गांधीतीर्थला सुपुर्द केली याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया गांधीतीर्थचे विश्वस्त अशोक जैन यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

७५.७१ कोटींच्या बनावट देयकाप्रकरणी एकास अटक

Next Post

जामनेर तालुक्यात सक्रिय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण संयुक्त शोध मोहिमेस सुरुवात

Next Post

जामनेर तालुक्यात सक्रिय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण संयुक्त शोध मोहिमेस सुरुवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d