Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

जळगाव – सामाजिक समता मंच रावेर व प्रकाशवाट मित्रपरिवार चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथील अल्पबचत भवन सभागृहात माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली . सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे व उदघाटक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हाध्यक्ष राजुभाऊ सूर्यवंशी हे होते .

विद्यार्थ्यांनी सर्वंकष परिवर्तनासाठी समाजात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मौलिक ग्रंथांचे चिंतन करून समाजात विचार पेरण्याचे काम करून समतावादी समाज निर्मितीसाठी परिश्रम घ्यावे असे आपल्या अध्यक्षीय भाषणात मुकुंदभाऊ सपकाळे यांनी आवाहन केले . विचार मंचावर सामाजिक समता मंचचे अध्यक्ष राजू भाऊ सवर्णे , उमेश गाढे , अमोल कोल्हे , सरपंच सचिन बिऱ्हाडे , प्रा. संजय साळवे , दिलीप सपकाळे , वाय एस महाजन , प्रा विजय गोसावी , सिद्धार्थ तायडे , सुनीता तायडे , उद्योजक विशाल देवरे उपस्थित होते . या वक्तृत्व स्पर्धेमध्ये 60 विद्यार्थ्यांना सहभागी झाले . राष्ट्र निर्मितीसाठी युवकांची भूमिका या विषयावर अतिशय परखड मत मांडुन अश्विनी शिंदे यांनी 7000 रुपये रोख व प्रमाणपत्र स्मृती चिन्हासह प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले , तर सर्वांगीण क्षेत्रात महिलांची झेप याविषयावर जागतिक आणि भारतीय स्तरावरील महिलांचे क्रांतिकारक योगदान विशद करत नेहा शिंदे यांनी 5000 रूपये रोख प्रमाणपत्र व स्मृतिचिन्हासह द्वितीय क्रमांकाचे बक्षीस घेतले , महात्मा फुले यांचे कार्य आणि कर्तृत्व याविषयावर आधुनिक भारतातील शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व नमूद करून हेमलता शिसोदे यांनी 3000 रुपये रोख प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे बक्षीस मिळवले . सायली महाजन , रोशन पाटिल , तपस्वी गवळी , भूमिकेत सोनवणे , जान्हवी चौधरी , गौरव पाटिल , सरोजिनी जैन यांना उत्तेजनार्थ 500 रुपये रोख प्रमाणपत्र व स्मृतीचिन्हाचे वितरण करण्यात आले .

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश गाढे यांनी तर सुत्रसंचलन नगीन इंगळे व आभार प्रदर्शन भीमराव कोचुरे यांनी केले . वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण मा. सुरेश ठाकूर , प्रा. सतिष अहिरे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक समता मंच , रावेर व प्रकाशवाट मित्रपरिवार , चोपडा यांच्यासह शुभांगी माळी , पूजा गुजराथी , घनश्याम माळी , शुभम रावते यांनी परिश्रम घेतले .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘सुस्वागतं रामराज्यम्’ कार्यक्रमातुन नर्तन किर्तनाच्या सुरेल संगमाची अनुभूती

Next Post

जिल्हा वकील ग्राहक सोसायटीकडून उडान फाऊंडेशनला एलईडी टीव्ही भेट

Next Post
जिल्हा वकील ग्राहक सोसायटीकडून उडान फाऊंडेशनला एलईडी टीव्ही भेट

जिल्हा वकील ग्राहक सोसायटीकडून उडान फाऊंडेशनला एलईडी टीव्ही भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo