Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘सुस्वागतं रामराज्यम्’ कार्यक्रमातुन नर्तन किर्तनाच्या सुरेल संगमाची अनुभूती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
‘सुस्वागतं रामराज्यम्’ कार्यक्रमातुन नर्तन किर्तनाच्या सुरेल संगमाची अनुभूती

जळगाव दि.2 प्रतिनिधी – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित व जोशी बंधू ज्वेलर्स प्रायोजित’सुस्वागतं रामराज्यं’ या सुंदर नृत्य- नाटिकेद्वारे गुढी पाडव्याची संध्याकाळ रंगली. नर्तन-कीर्तनाचा सुरेल संगमाने जळगावकर रसिक मंत्रमुग्ध झाले. अयोध्यामधील रामजन्मोत्सव, जनकनगरीतील रामसीतास्वयंवर, विश्वामित्रासोबत असलेले गुरूशिष्याचे नाते, अयोध्यानगरीमधील राज्यभिषेकची तयारी, मंथरा कैकयीचे संभाषण, राम वनवास, भरतराम भेटीचा सोहळा, सीता अपहरण, राम रावण युध्द रामायणातील प्रत्येक क्षण अंगावर अक्षरशः रोमांचक निर्माण करीत होते. डॉ. भवरलाल व कांताबाई फाऊंडेशनचे सहकार्यातुन छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी जोशी बंधू ज्वेलर्सचे अशोक जोशी, राम मंदिर संस्थानचे गादीपती ह.भ.प. श्रीराम जोशी, जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे अनिल जोशी, नृत्य नाटिका सादरकर्ते अक्षय आयरे, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ.विवेकानंद कुलकर्णी, विश्वस्त शरद छापेकर, दीपक चांदोरकर उपस्थित होते. जोशी बंधू ज्वेलर्सचे अशोक जोशी, श्रीपाद जोशी, जैन इरिगेशनचे व्ही एम भट, डाॕ.विवेकानंद कुलकर्णी यांच्याहस्ते गुढी देऊन कलावंतांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. गीत रामायण कीर्तन आणि नर्तन, या दोन्ही भारतीय कला परंपरांचा संगम या नृत्य नाटिकेत श्रोत्यांना आनंद देऊन गेले. ‘भरत नृत्यम्’ ही नाट्य शास्त्रावर आधारित मार्गी नृत्यशैली रसिकांनी अनुभवी. दक्षिण भारतीय शास्त्रीय नृत्याची जोड असे आगळेवेगळे स्वरूप रसिकांना मोहिनी घातली. गीतरामायण अक्षय आयरे यांच्या संकल्पित व दिग्दर्शित केले असुन त्यांच्यासह पूजा भुर्के, लतिका पाटील, सनया बारस्कर, जान्हवी चारी, लाश्या पंडा, नम्रता शर्मा, मेधावी शर्मा, दिव्यश्री शर्मा, जाह्नवी तन्ना, आध्या भटनागर, चैताली शेट्टी , देवश्री गंभीर, साक्षी अय्यर, रुची बागवे, रुचिरा निंबरे, नेहा भोसले, स्नेहा वडके, स्नेहल तन्ना या शिष्यांचाही या सादरीकरणात समावेश होता. तांत्रिक सहाय्य, प्रकाश योजना रीमा आयरे आणि संगीत ध्वनीफित रमेश आयरे यांनी केले. सूत्रसंचालन दीपिका चांदोरकर यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अवैधरित्या प्रवाशी वाहनांमधून नागरिकांनी प्रवास करु नये;उप प्रादेशिक परिवहन अधिकारी – श्याम लोही

Next Post

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

Next Post
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo