Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार सुखदेव गाडेकर यांना उपचारासाठी २५ हजारांचा धनादेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/02/2020
in राष्ट्रीय, विशेष
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार सुखदेव गाडेकर यांना उपचारासाठी २५ हजारांचा धनादेश

संगमनेर – (शहर प्रतिनिधी) – येथील ज्येष्ठ पत्रकार सुखदेव गाडेकर यांना औषध उपचारासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई शाखा संगमेनर यांच्या वतीने पंचवीस हजार रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्य संघटनेचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते देण्यात आला आहे. यावेळी विश्वासराव आरोटे यांनी सांगितले की, जेवढे संघटनेचे सभासद आहेत. त्या सर्व सभासदांचा एक महिन्याच्या आतमध्ये मेडीक्लेम पॉलिसी काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई शाखा संगमनेर यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुखदेव गाडेकर यांना काही दिवसांपुर्वी हृदयाच्या त्रासामुळे खासगी रुग्णालयामध्ये औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांच्यावर आर्थिक व मानसिक ताण पडला. परंतु महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी पत्रकार संघाच्या माध्यमातून सुखदेव गाडेकर यांना मदतीचा हात देऊन पंचवीस हजार रुपयांचा धनादेश दिला आहे.

यावेळी विश्वास आरोटे म्हणाले की, सध्या संगमनेरच्या संघटनेमध्ये वीस सभासदांची संख्या आहे. त्या सर्व सभासदांची मेडिक्लेम पॉलिसी एक महिन्याच्या आतमध्ये काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर पत्रकारांना जी मदत लागेल ती सर्व मदत या पत्रकार संघाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मात्र तो पत्रकार संघटनेचा सभासद असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरुवातीला काम करतांना खूप अडीअडचणी आल्या अनेकांनी नावेही ठेवली. पण तरीही आपण न डगमगता संघटनेसाठी काम करत राहिलो आहे. तुमच्यासारखे सर्व सभासद माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्यामुळेच मी आज राज्यभर फिरत आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्य ३६ जिल्ह्यांमध्ये आहे. संघटनेचा एखादा पत्रकार आजारी पडल्यास त्यासाठी पत्रकार संघ मदत करत आहे. भविष्यात आपल्या सर्वांना एक दिलाने काम करायचे असल्याचेही शेवटी त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दत्ताभाऊ उणवने, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल राहाणे, कार्याध्यक्ष अनिल चौधरी, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभोषडोके, पत्रकार दत्ता गाडगे, दत्ता जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, संगमनेर शाखेचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ मदने, तालुका सचिव संजय गोपाळे, सदस्य राजू नरवडे, शेखर पानसरे, विकास वाव्हळ, बाबासाहेब कडू, संजय साबळे, भारत पडवळ, बाळासाहेब गडाख, अंकुश बुब आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका सचिव संजय गोपाळे यांनी केली. तर आभार भारत पडवळ यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘बाबासाहेबांच्या ‘ मूकनायका’ ची शताब्दी-अशोक पारधे,जळगाव

Next Post

प.न.लुंकड कन्याशाळेत दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत विविध उपक्रम

Next Post
प.न.लुंकड कन्याशाळेत दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत विविध उपक्रम

प.न.लुंकड कन्याशाळेत दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत विविध उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo