Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेद्वारे कारवायांचा धडाका

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेद्वारे कारवायांचा धडाका

कुठे अलिशान वाहनांची जप्ती, तर कुठे तोडला पाणीपुरवठा;कारवाईनंतर अनेक प्रकरणी मालमत्ता कर ज़मा

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा देणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असणार आहे ‘मालमत्ता कर’ नागरिकांनी वेळेत महापालिकेकडे जमा करावा यासाठी महापालिकेने कारवायांचा धडाका सुरू केला आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या धडक कारवाई मोहिमेंतर्गत अंतर्गत मालमत्ता कर थकबाकीपोटी आतापर्यंत अनेक ठिकाणी अलिशान वाहनांची जप्ती करण्याचा पर्याय वापरण्यात आला, तर काही ठिकाणी जल-जोडणी खंडित करण्यात आली. ज्यानंतर अनेक प्रकरणी संबंधितांद्वारे मालमत्ता कर रकमेचा भरणा महापालिकेकडे करण्यात आला आहे. यानुसार आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये रुपये ५ हजार २०० कोटी मालमत्ता कर जमा करण्याचे लक्ष्य असून आज पर्यंत रुपये ३ हजार ६५० कोटी एवढा मालमत्ता कर जमा झाला आहे.

वरील नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या कारवायांपैकी ५ कारवायांचा तपशील पुढील प्रमाणे आहे:-

१. ‘एम पश्चिम’ विभाग कार्यक्षेत्रातील मे. चंदुलाल पी. लोहना (विकासक मे. जय कन्स्ट्रक्शन) यांची मालमत्ता कराची रुपये ३८ लाख ८० हजार ७०५ इतकी थकबाकी असल्यामुळे त्यांच्या मालकीची ‘बी एम डब्लू कार’ जप्त करण्यात आली. त्यानंतर संबंधीतांद्वारे रुपये १९ लाख इतकी रक्कम जमा करुन गाडी सोडवून नेण्यात आली.

२. एम पश्चिम विभाग कार्यक्षेत्रातील मे. युनीटी लॅण्ड कन्सल्टन्सी यांची मालमत्ता कराची रुपये १ कोटी १० लाख २२ हजार २४० इतकी थकबाकी असल्यामुळे त्यांच्या मालकीची ‘ब्रीझा कार’ जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्या बांधकामाच्या जागेवरील ऑफिस ‘सिल’ केले आणि बांधकाम कार्य बंद करण्यात आले.

३. ‘एच पूर्व’ विभागाच्या हद्दीतील पक्षकार मे. भारत डायमंड बोर्स यांच्या प्रतिदानाच्या विवादा  प्रकरणी तोडगा काढून रु. २५.८६ कोटी इतकी मालमता कर वसूली करण्यात आली. तसेच ‘मे. रिलायन्स इंडस्ट्रिज लि.’ यांच्या विवीध मालमतांच्या भांडवली मूल्याविरोधातील प्रलंबित तकारी प्रकरणातून पक्षकाराकडून रु. ३९ कोटी इतक्या मालमता कराच्या रक्कमेची वसूली करण्यात आली.

४. ‘के पूर्व’ विभाग हद्दीतील अंधेरी असणाऱ्या ‘सोलिटेयर कॉर्पोरेट पार्क’ व ‘वरटेक्स बिल्डिंग’  यांच्या जलजोडण्या खंडित करण्यात आल्या. तसेच मलवाहिनीही थोपवण्यात आली. या कारवाईनंतर मालमत्ता धारकांनी थकीत रकमेच्या ५०% रक्कम, अर्थात अनुक्रमे रक्कम रुपये ९.६० कोटी व ३१ लाख रुपये भरण्यात आले.

५. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एम पश्चिम’ विभाग कार्यक्षेत्राच्या हद्दीतील ‘आय मॅक्स थिएटर’ ची मालमत्ता कराची थकबाकी ही रुपये ७५ लाख इतकी झाली असल्यामुळे संबंधित मालमत्तेची जलजोडणी खंडित करण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त उद्या राज्यपालांच्या उपस्थितीत वेबिनार

Next Post

न्यायालयाची नवीन इमारत संगमनेरच्या वैभवात भर टाकणारी – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Next Post
न्यायालयाची नवीन इमारत संगमनेरच्या वैभवात भर टाकणारी – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

न्यायालयाची नवीन इमारत संगमनेरच्या वैभवात भर टाकणारी – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo