Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गटात गुलाबराव पाटलांना प्रचंड प्रतिसाद !

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/10/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गटात गुलाबराव पाटलांना प्रचंड प्रतिसाद !

लाडक्या बहिणींनी केल औक्षण : कार्यकर्त्यांचा उत्साह

म्हसावद/जळगाव – (प्रतिनिधी) – शिवसेनेचे नेते व मंत्री, महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गटात प्रचाराला जोमाने सुरूवात केली आहे. या गटातील म्हसावद, बोरणार, लमांजन, कुऱ्हाळदे, बिलवाडी, डोमगाव, बिलखेडा, वावडदा या गावात त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून, ज्येष्ठांनी त्यांना आशीर्वाद दिले तर गावातील महिलांनी महायुतीचे उमेदवार गुलाबभाऊंचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले.

गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारा दरम्यान म्हसावद, बोरणार, लमांजन, कुऱ्हाळदे, बिलवाडी, डोमगाव, बिलखेडा, वावडदा या गावांमध्ये जाऊन थेट जनतेशी संवाद साधला.
त्यांच्या प्रचार रॅलीत जेष्ठांसह महिलांचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. प्रत्येक गावांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. अनेक ठिकाणी ज्येष्ठांनी त्यांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या, तर महिलांनी औक्षण करून त्यांचा सन्मान केला. म्हसावद – बोरणार या जिल्हा परिषद गटात गुलाबराव पाटील यांचेवर नागरिकांचे असलेले प्रेम आणि विश्वास हे त्यांच्या विजयाची खात्री देणारे दिसून आले.

आजचा प्रचार दौरा : भोकर कानळदा जि. प. गट
आव्हाणे येथे सकाळी 8.00 वा., खेडी खु. स. 10:00 वा,वडनगरी स. 11:00 वा, फुपनगरी दुपारी 12: 00, त्यानंतर कानळदा येथे दुपारी 12.00 ते 1:30 वाजेपर्यंत विश्रांती राहणार असून कूवारखेडे येथे दुपारी 2:30 वा, कानळदा दुपारी 3.00 वा., नांद्रा बु सायंकाळी 5.00 प्रचार रॅली असल्याने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुती मार्फत करण्यात आले आहे.

यांची होती प्रमुख उपस्थिती
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, सेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, सचिन पवार,भाजपाचे भाऊसाहेब पाटील, रामचंद्र पाटील, रवी पाटील, प्रदीप पाटील, उपसभापती साहेबराव वराडे, दूध संघाचे रमेशआप्पा पाटील, उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, रवींद्र कापडणे, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, अर्जुन पाटील, सचिन पाटील, सरपंच ललित साठे, जळके सरपंच राजूभैय्या पाटील, चंद्रशेखर पाटील, नारायण चव्हाण, सरपंच गोविंद पवार, समाधान चिंचोरे, शितलताई चिंचोरे, जेष्ठ शिवसैनिक विष्णूआप्पा चिंचोरे, धोंडूभाऊ जगताप, दीनोद पाटील, समाधान पाटील, सुनील बडगुजर, सुनिल मराठे, मार्केटच्या यमुनाबाई सपकाळे, उपतालुका प्रमुख मंगलाताई गोपाळ, अनिता चीमनाकरे, पी. के. पाटील, जितू पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेना – रीपाई महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वसू बारस च्या शुभ मुहूर्तावर महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजु मामा) उमेदवारी अर्ज दाखल करणार…

Next Post

भारतमाता,वंदेमातरमच्या जयघोषात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo